"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 01:49 PM2024-04-28T13:49:24+5:302024-04-28T13:49:43+5:30

"ते २० दिवस मला कॉल करत होते, पण...", नम्रता संभेरावने सांगितला आमिर खानच्या सिनेमासाठी ऑडिशन दिल्याचा किस्सा

namrata sambherao revealed she has audition for aamir khan hindi film shared experienced | "आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा

"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून घराघरात पोहोचलेली नम्रता संभेराव एक गुणी अभिनेत्री आहे. अनेक कॉमेडी शो, मालिका आणि सिनेमांत काम केलेल्या नम्रताचा चाहता वर्ग मोठा आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खानही नम्रताचा फॅन आहे. हरहुन्नरी अभिनेत्री असलेल्या नम्रताला आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसमधून ऑडिशनसाठी फोन आल्याचा खुलासा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नम्रताने केला आहे. 

नम्रता 'नाच गं घुमा' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सध्या ती अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. नुकतीच तिने राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने आमिर खानचा किस्सा सांगितला. आमिर खान प्रोडक्शनच्या एका प्रोजेक्टसाठी नम्रताने ऑडिशन दिल्याचं सांगितलं. ती म्हणाली, "काही दिवसांपूर्वी मला आमिर खान प्रोडक्शनमधून सिनेमाच्या ऑडिशनसाठी फोन आला होता. स्वत: आमिर खान सरांनी माझं नाव सुचवलं, असं त्यांनी मल सांगितलं. माझ्याशी त्यांचा संपर्क होत नव्हता. त्यांनी मला इन्स्टाग्रामवर मेसेज केला होता. पण, तो रिक्वेस्टमध्ये गेला होता. जेव्हा त्यांचा फोम आला तेव्हा ते मला म्हणाले की २० दिवस झाले आम्ही तुम्हाला कॉल करत आहोत." 

"ऑडिशनसाठी आमिर खान सरांनी तुमचं नाव सुचवलं, म्हणून आम्ही तुम्हाला शोधत होतो. एका खलनायिकेच्या भूमिकेसाठी त्यांनी माझं नाव सुचवलं होतं. मी ऑडिशन तर दिली आहे. मी यात सिलेक्ट होईन की नाही? ही भूमिका मला मिळेल की नाही, हे मला माहीत नाही. पण, मी इथपर्यंत पोहोचले. हेच माझ्यासाठी खूप आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे," असंही पुढे नम्रताने सांगतिलं. 

दरम्यान, नम्रता 'नाच गं घुमा' सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमात मुक्ता बर्वे, सुकन्या मोने, सारंग साठ्ये हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. परेश मोकाशी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून १ मेला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: namrata sambherao revealed she has audition for aamir khan hindi film shared experienced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.