Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 04:01 PM2024-05-19T16:01:23+5:302024-05-19T16:04:16+5:30

Cannes 2024 च्या रेड कार्पेटवर कियाराने मुलाखत देताना फेक टोन वापरल्याचं लोकांनी पकडलं. त्यामुळे ती चांगलीच ट्रोल झाली (kiara advani)

kiara advani troll after cannes 2024 fake english accent interview video viral | Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

अभिनेत्री कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री.  कियाराला आपण 'भूल भूलैय्या 2', 'कबीर सिंग', 'शेरशाह', 'जुग जुग जिओ' अशा विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. कियारा तशी सर्वांची लाडकी. ती सहसा कोणत्याही वादविवादात अडकत नाही. पण नुकतंच कियाराला लोकांच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. Cannes च्या रेड कार्पेटवर विचित्र टोनमध्ये इंग्रजी बोलल्याने कियारावर नाराजीचे सूर उमटले आहेत. 

नेमकं काय घडलं?

रेड कार्पेटवर असताना कियाराने इव्हेंटमध्ये आल्याबद्दलचा तिचा उत्साह शेअर केला. त्याबद्दल बोलताना ती म्हणाली, "हे खूप छान आहे. माझ्या कारकिर्दीला आता एक दशक पूर्ण होत आहे, त्यामुळे हा खूप खास क्षण आहे. कान्स येथे पहिल्यांदाच आल्याबद्दल आणि रेड सी फाऊंडेशन फॉर वुमन इन सिनेमाने सन्मानित केल्याबद्दल मी खूप आभारी आहे." प्रतिक्रिया देताना कियारा फेक इंग्रजी टोन वापर असल्याचं लोकांनी लगेच पकडलं.

लोकांची तीव्र नाराजी

 प्रतिक्रिया देताना कियाराने खोटा इंग्रजी accent वापरल्याने तिला मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं. अनेकांनी कियारावर खोटा आव आणल्याचा आरोप केला. एकाने लिहिले, "अभिनेत्री म्हणून तू चांगली आहेस. पण असे उच्चार का?' एका चाहत्याने विचारले की, 'भारतीय उच्चार याशिवाय भारतीय लहेजा कोणत्याही प्रकारे वाईट किंवा आक्षेपार्ह नाही, मग हे लोक तसं का बोल नाहीत?' याशिवाय आणखी एकजण म्हणाला, 'असं बोलण्यापेक्षा तिने स्वतःच्या खऱ्या टोनमध्ये बोलायला हवं होतं.'

Web Title: kiara advani troll after cannes 2024 fake english accent interview video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.