"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 10:54 AM2024-04-29T10:54:37+5:302024-04-29T10:55:11+5:30

Jui Gadkari : नुकतेच जुई गडकरीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात तिला एका तरूणीने धमकी दिली आहे. त्यावर आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर या तरूणीला चांगलंच सुनावलं आहे.

Jui Gadkari was threatened by a young woman; The actress said, now directly the police… | "काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…

"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…

जुई गडकरी (Jui Gadkari) मराठी टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. पुढचं पाऊल मालिकेतून ती घराघरात पोहचली. सध्या जुई गडकरी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत तिने साकारलेल्या सायलीच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. जुई सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. अनेकदा ती तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिने इंस्टाग्राम स्टोरीवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात तिला एका तरूणीने धमकी दिली आहे. त्यावर आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर या तरूणीला चांगलंच सुनावलं आहे.

कलाकारांचे अपडेट जाणून घेण्यासाठी लोक सोशल मीडियावर त्यांना फॉलो करतात. मात्र कलाकारांना प्रत्येकाला फॉलो करणं शक्य नसतं. फॉलो केले नाही म्हणून एका तरूणीने अभिनेत्रीला धमकी दिली आहे. तिने केलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या तरुणी जुईला धमकीच्या मेसेजमध्ये लिहिले, काय गं तुला खूप माज आलाय का? आम्ही तुला फॉलो करायचं आणि तुला आम्हाला फॉलो करायला काय झालं? आताच्या आता आम्हाला फॉलो करायचं. तू फॉलो कर नाहीतर तुला जेल मध्ये टाकेन. आजपर्यंत तू आमची आवडती होतीस कारण, आम्हाला वाटलं तू फॉलो करशील. पण, तू फॉलो केलं नाहीस आता तुला पोलिसात टाकेन…मी उद्याच्या उद्या तुझ्या गावाला येते कर्जतला समजलं कुठेही पळायचं नाही.

जुई गडकरीने संतापून मेसेजचे स्क्रीनशॉट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. जुई म्हणाली की, हे मी सहन करू शकत नाही. आता थेट पोलीस स्टेशनला भेटूच मग आपण…राखी सुतार तू फेमस झाली. येच कर्जतला बघतेच मी पण!

वर्कफ्रंट

जुई ही पुढचं पाऊल या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. पुढचं पाऊल मालिकेत जुईनं साकारलेली कल्याणी प्रेक्षकांना आवडली. आजही या पात्राची प्रेक्षक आठवण काढत असतात. पुढचं पाऊल नंतर सरस्वती, वर्तुळ, बिग बॉस मराठी आणि आता ठरलं तर मग या मालिकेतून जुई गडकरी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

Web Title: Jui Gadkari was threatened by a young woman; The actress said, now directly the police…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.