Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 02:40 PM2024-05-16T14:40:34+5:302024-05-16T15:21:27+5:30

Fact Check : मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली असं सांगणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र हा दावा खोटा आहे.

Video gold biscuites found in bjp kit viral claim | Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

Claim Review : भाजपाच्या किटमध्ये मुंबईत सोन्याची बिस्किटं सापडली.
Claimed By : Twitter User
Fact Check : चूक

Created By: Newschecker
Translated By: ऑनलाइन लोकमत

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. याच दरम्यान मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली असं सांगणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. घाटकोपर 170 मतदार संघात बूथ मटेरियलमध्ये सोन्याची बिस्कीटं सापडली असा दावा करण्यात येत आहे.

या दाव्याचे अर्काइव्ह येथे पाहता येईल.

आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर न्यूजचेकरला अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला आहे. तसेच याबाबतची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check/ Verification

सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असल्याच्या दाव्याचा तपास करण्यासाठी आम्ही संबंधित व्हायरल व्हिडीओ बारकाईने पाहिला. याच दरम्यान व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी आम्ही Google वर रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिलं. मात्र व्हिडिओचा मूळ स्रोत किंवा त्याची अधिकृत सूत्राद्वारे असलेली माहिती उपलब्ध झाली नाही.

आम्ही Google वर संबंधित किवर्डसच्या माध्यमातून शोध घेतला. तेव्हा आम्हाला यासंदर्भात काही न्यूज रिपोर्ट्स मिळाले. ते येथे, येथे आणि येथे वाचता येतील.

NDTV चा पहिला रिपोर्ट होता. 11 मे 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या या रिपोर्टमध्ये या घटनेसंदर्भात भाजपाचे मुंबई नॉर्थ सेंट्रल जिल्हा उपाध्यक्ष अजय बडगुजर यांनी दिलेली माहिती आहे. त्यांनी घटनेसंदर्भात स्पष्टीकरण देताना आपल्याला संबंधित पथकाने अडवून कसा त्रास दिला, सोन्याच्या बिस्किटासाठी कसा तपास झाला आणि शेवटी परफ्युमची प्लॅस्टिकची बाटली कशी सापडली, याबाबत माहिती दिली. संबंधित रिपोर्टमध्ये याबाबतचा व्हिडीओ रिपोर्टसुद्धा आम्हाला पाहायला मिळाला.

आणखी तपास करताना आम्हाला, lokmat.com ने 11 मे 2024 रोजी याच संदर्भात प्रसिद्ध केलेली बातमी सापडली. "घाटकोपरमध्ये सोन्याच्या बिस्किटांची अफवाच निघाली आणि प्रचाराचे साहित्य सापडलं" असं या बातमीत म्हटलं आहे. या बातमीत मुंबईचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी तपासाअंती सोन्याची बिस्किटं नव्हे तर प्रचाराचं साहित्य मिळाल्याचं म्हटलं असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

तपास करताना आम्हाला mumbaipress.com ने 11 मे 2024 रोजी प्रसिद्ध केलेली बातमी सापडली. तेथेही पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांचा हवाला देऊन तपासादरम्यान सोन्याची बिस्किटे आहेत असा आवाज ऐकायला आला असला तरी अखेरीस प्रचाराचं साहित्य सापडल्याचं सांगितलं आहे.

गाडीत सोन्याची बिस्किटं असल्याच्या संशयावरून भाजपाचे मुंबई नॉर्थ सेंट्रल जिल्हा उपाध्यक्ष अजय बडगुजर यांना पोलीस स्थानकात नेऊन तपास करण्यात आला. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा ते म्हणाले की, 9 मे रोजी कुटुंबासमवेत जात असताना आपल्याला संशयाने अडवून घाटकोपरच्या चिरागनगर पोलीस स्थानकात नेण्यात आले. बराच काळ थांबवून ठेवण्यात आलं. मात्र माझ्या गाडीत प्रचाराचं साहित्य असल्याचं आणि सोन्याचे बिस्कीटं ही अफवा असल्याचं स्पष्ट होताच सोडून देण्यात आलं. मध्यरात्रीपर्यंत आपल्याला आणि कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागला आहे. व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांनीही चुकीची अफवा पसरवणं सुरूच ठेवलं आहे.

आम्ही चिरागनगर पोलीस स्टेशनही संपर्क साधला. सोन्याची बिस्किटं सापडल्याची कोणतीही फिर्याद नोंद झालेली नाही. त्यादिवशीचा प्रकार हा निवडणूक पथकाचा नियमित तपासाचा भाग होता. त्यात सोन्याची बिस्किटं सापडली नाहीत असं सांगण्यात आलं.

Conclusion

आमच्या तपासात अशाप्रकारे भाजपाच्या किटमध्ये मुंबईत सोन्याची बिस्किटं सापडली हा दावा खोटा आहे. हे स्पष्ट झालं आहे. मुंबईच्या घाटकोपर भागात संशयावरून तपासणी करण्यात आलेल्या भाजपाच्या किटमध्ये प्रचाराचं साहित्य आणि परफ्यूमच्या प्लास्टिक बॉटल होत्या हे तपासात उघड झालं आहे.

Result: False

Our Sources
News published by NDTV on May 11, 2024
News published by Lokmat on May 11, 2024
News published by Mumbai Press on May 11, 2024
Conversation with Ajay Badgujar, District Vice President, BJP Mumbai North Central
Conversation with Chirag Nagar Police station, Ghatkoper, Mumbai

(सदर फॅक्ट चेक Newschecker या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.)
 

Web Title: Video gold biscuites found in bjp kit viral claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.