विटाईत दिवसा घरफोडी, पावणेदोन लाखांचे ऐवज लंपास; अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

By अतुल जोशी | Published: May 2, 2024 05:17 PM2024-05-02T17:17:09+5:302024-05-02T17:18:31+5:30

घटना २८ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी १ मे रोजी साक्री पोलिसात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Burglary in the daytime compensation of fifty two lakhs; A case has been registered against an unknown person | विटाईत दिवसा घरफोडी, पावणेदोन लाखांचे ऐवज लंपास; अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

विटाईत दिवसा घरफोडी, पावणेदोन लाखांचे ऐवज लंपास; अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

धुळे: विटाई (ता. साक्री) येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करीत रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २८ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी १ मे रोजी साक्री पोलिसात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

विटाई येथे राहणाऱ्या केदाबाई खैरनार यांच्या घराच्या मागच्या दरवाजाची फळी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. चोरट्यांनी १ लाख रूपये रोख तसेच किराणाच्या गल्यातील १७ हजार रूपये रोख तसेच ५१ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे, पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी केदाबाई हिंमत खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून साक्री पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक संसारे करीत आहेत.

Web Title: Burglary in the daytime compensation of fifty two lakhs; A case has been registered against an unknown person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.