Tamil Nadu Stampede: फुकटच्या साड्या मिळविण्यासाठी महिलांमध्ये चेंगराचेंगरी; चार जणींचा मृत्यू, अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 11:09 PM2023-02-04T23:09:27+5:302023-02-04T23:09:50+5:30

साड्या लवकर मिळविण्याच्या प्रयत्नात ही घटना घडली. महिलांनी व्यासपीठाकडे धाव घेतली आणि चेंगराचेंगरी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Tamil Nadu Stampede: Women stampede to get free sarees; Four dead, many injured | Tamil Nadu Stampede: फुकटच्या साड्या मिळविण्यासाठी महिलांमध्ये चेंगराचेंगरी; चार जणींचा मृत्यू, अनेक जखमी

Tamil Nadu Stampede: फुकटच्या साड्या मिळविण्यासाठी महिलांमध्ये चेंगराचेंगरी; चार जणींचा मृत्यू, अनेक जखमी

googlenewsNext

तामिळनाडूमध्ये मोठी चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. वनियाम्बादीमध्ये फुकट साड्या वाटप होत होते, त्या ठिकाणी साड्या मिळवण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यामध्ये चेंगराचेंगरी झाल्याने चार महिलांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जणी जखमी झाल्या आहेत. 

साड्या लवकर मिळविण्याच्या प्रयत्नात ही घटना घडली. महिलांनी व्यासपीठाकडे धाव घेतली आणि चेंगराचेंगरी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 1000 महिला या कार्यक्रमाला पोहोचल्या होत्या. यादरम्यान अचानक चेंगराचेंगरी होऊन अनेक महिला जखमी झाल्या. 4 गंभीर जखमी महिलांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

Web Title: Tamil Nadu Stampede: Women stampede to get free sarees; Four dead, many injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.