SSR Case : मुंबई पोलीस आयुक्तांची बदनामी केल्याप्रकरणी सायबर सेलकडे दोन गुन्हे दाखल 

By पूनम अपराज | Published: October 6, 2020 03:53 PM2020-10-06T15:53:22+5:302020-10-06T15:55:58+5:30

SSR Case : वेगवेगळ्या सोशल मीडियावरून पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदनामी केली जात असल्याचं उघडकीस आलं. याप्रकरणी मुंबई सायबर सेलकडे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

SSR Case: Two cases filed against Cyber Cell for defaming Mumbai Police Commissioner | SSR Case : मुंबई पोलीस आयुक्तांची बदनामी केल्याप्रकरणी सायबर सेलकडे दोन गुन्हे दाखल 

SSR Case : मुंबई पोलीस आयुक्तांची बदनामी केल्याप्रकरणी सायबर सेलकडे दोन गुन्हे दाखल 

Next
ठळक मुद्देमुंबई पोलीस आयुक्तांची बदनामी केल्याप्रकरणी तसेच त्यांच्या व मुंबई पोलिसांविरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,” अशी माहित रश्मी करंदीकर यांनी सांगितली.सुशांत सिंग राजपूत मृत्यू ही आत्महत्याच होती. हत्या नव्हती असा खुलासा एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने केल्यानंतर या सर्व प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.

एम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या अहवालातनंतर अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. या अहवालाबाबत भूमिका स्पष्ट करताना मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबईपोलिसांची प्रतिमा मलिन करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप करण्यात आला. त्यानंतर वेगवेगळ्या सोशल मीडियावरून पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदनामी केली जात असल्याचं उघडकीस आलं. याप्रकरणी मुंबई सायबर सेलकडे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी याविषयी माहिती दिली असून “ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुकसारख्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या अनेक अकाऊंट असलेल्यांवर आणि फेक अकाऊंटस्विरोधात मुंबई पोलीस आयुक्तांची बदनामी केल्याप्रकरणी तसेच त्यांच्या व मुंबई पोलिसांविरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,” अशी माहित रश्मी करंदीकर यांनी सांगितली. फेसबुक, ट्वीटरवर हजारो फेक अकाऊंट तयार करण्यात आले होते. या अकाऊंटच्या माध्यमातून मुंबई पोलीस आणि सरकारबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्या होत्या. यात अत्यंत खालच्या थराला जाऊन पोस्ट करण्यात आल्या आहे, असे मुंबई सायबर पोलिसांनी म्हटले आहे.

SSR Case : मुंबई पोलिसांची प्रतिमा मालिन करण्याचे षडयंत्र, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा आरोप


परमबीर सिंग पुढे म्हणाले, सुशांतप्रकरणी आम्ही मुंबई पोलिसांनी केलेला सर्व तपास सर्वोच्च न्यायालयाला सादर केले होता आणि ते समाधानकारक होते. सत्य हे कायम सत्यच असते ते सगळ्यांनी लक्षात ठेवा. सोशल मीडियावर अनेक फेक अकाउंटस तयार करून  त्या माध्यमातून पोलिसांची बदनामी केली गेली. त्या सर्व फेक अकाउंटसचा तपास सुरू आहे अशी माहितीही सिंग यांनी दिली होती. 


सुशांत सिंग राजपूत मृत्यू ही आत्महत्याच होती. हत्या नव्हती असा खुलासा एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने केल्यानंतर या सर्व प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. दरम्यान, या प्रकरणावरून सुशांत सिंग मृत्यू प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यातील आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहे.  घाटकोपर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राम कदम यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देखमुख यांच्यावर ट्वीटकरून निशाणा साधला आहे. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास वळवून ड्रग्स कनेक्शनवर आणला आणि त्यातही ड्रग्सबाबत तपासाकडे मुंबई पोलिसांनी दुर्लक्ष का केलं? मुंबई पोलिसांना काही बड्या राजकीय नेत्यांना वाचवायचं होतं का?, मुंबई पोलीस कोणाला तरी वाचवतायेत का? असा सवाल भाजपाने केला होता.

 

Read in English

Web Title: SSR Case: Two cases filed against Cyber Cell for defaming Mumbai Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.