SSR Case : सुशांतची बहीण बनावट डिस्क्रिप्शनद्वारे ड्रग्ज देण्याचा करत होती प्रयत्न, पोलीस आयुक्तांनी दिली खळबळजवक माहिती 

By पूनम अपराज | Published: October 6, 2020 09:47 PM2020-10-06T21:47:38+5:302020-10-06T21:48:27+5:30

SSR Case : सुशांतची एक बहिण दिल्लीतील डॉक्टर आणि सरकारी रुग्णालयाच्या मदतीने बनावट डिस्क्रिप्शन, रेकॉर्ड तयार करून त्याला ड्रग्ज देण्याचा प्रयत्न करत होती.

SSR Case: Sushant's sister was try to giving drugs through fake prescription, Commissioner of Police gives sensational information | SSR Case : सुशांतची बहीण बनावट डिस्क्रिप्शनद्वारे ड्रग्ज देण्याचा करत होती प्रयत्न, पोलीस आयुक्तांनी दिली खळबळजवक माहिती 

SSR Case : सुशांतची बहीण बनावट डिस्क्रिप्शनद्वारे ड्रग्ज देण्याचा करत होती प्रयत्न, पोलीस आयुक्तांनी दिली खळबळजवक माहिती 

Next
ठळक मुद्देरियाने वांद्रे पोलीस ठाण्यात सुशांतच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल केला होता. सुशांतची एक बहिण बनावट डिस्क्रिप्शन, रेकॉर्डच्या आधारे त्याला ड्रग्ज देण्याचा प्रयत्न करत होती अशी माहिती उघडकीस आली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून सुरु असलेला तपास सुरु आहे. दुसरीकडे एम्स रुग्णालयाने सुशांतच्या खुनाचा दावा फेटाळला असून ही आत्महत्याच असल्याचं स्पष्ट केले आहे. सुशांत प्रकरणात ड्रग्ज अँगलने तपास सुरु असून अनेक मोठ्या सेलिब्रेटींची एनसीबीकडून चौकशी झाली आहे. त्यातच रियाने वांद्रे पोलीस ठाण्यात सुशांतच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल केला होता. सुशांतची एक बहिण बनावट डिस्क्रिप्शन, रेकॉर्डच्या आधारे त्याला ड्रग्ज देण्याचा प्रयत्न करत होती अशी माहिती उघडकीस आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी याबाबत एबीपी माझाशी बोलताना माहिती दिली.

सुशांतची एक बहिण दिल्लीतील डॉक्टर आणि सरकारी रुग्णालयाच्या मदतीने बनावट डिस्क्रिप्शन, रेकॉर्ड तयार करून त्याला ड्रग्ज देण्याचा प्रयत्न करत होती. त्यासंबंधी सुशांतची बहिण, नातेवाईक आणि काही डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तो गुन्हा देखील सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. सीबीआय यासंबंधी तपास करेल असा विश्वास असल्याचं परमबीर सिंग यांनी सांगितलं आहे. आमच्याकडेही सुशांत सिंह ड्रग्ज घेत असल्याची माहिती आली होती. ड्रग्ज घेत असल्याने त्याचा मृत्यू झाला का याचा तपास आम्ही करत होतो, अशी माहिती परमबीर सिंग यांनी दिली.

याआधीच पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या करण्यापूर्वी गुगलवर ‘पेनलेस डेथ’ याविषयी सर्च केलं होतं असं सांगितलं होतं. तसेच सुशांतने गुगलवर ‘पेनलेस डेथ’ याविषयी सर्च केलं. बायपोलर डिसॉर्डर, स्किझोफ्रेनिया याबद्दलही सर्च केलं होतं” अशी माहिती परमवीर सिंग यांनी पत्रकारांना दिली होती. “सुशांतच्या डॉक्टरने त्याला मानसिक समस्या असल्याचं सांगितलं होतं. त्याला बायपोलार डिसॉर्डर होता. मार्चपासून त्याने औषध घेणं बंद केलं होतं. त्यामुळे त्याचा तणाव वाढला होता,” असं परमबीर सिंग यांनी सांगितलं.

Web Title: SSR Case: Sushant's sister was try to giving drugs through fake prescription, Commissioner of Police gives sensational information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.