जोगेश्वरीमध्ये बँकेतून महिला कर्मचाऱ्याचा मोबाईल लंपास! पोलिसांकडे तक्रार, गुन्हा दाखल
By गौरी टेंबकर | Published: May 11, 2024 08:39 PM2024-05-11T20:39:28+5:302024-05-11T20:40:01+5:30
बँकेमध्ये काम करणाऱ्या एका बँकरचा मोबाईल ब्रांच कार्यालयातून पळवून नेण्याचा घडला प्रकार
गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बँकेमध्ये काम करणाऱ्या एका बँकरचा मोबाईल ब्रांच कार्यालयातूनपळवून नेण्याचा प्रकार जोगेश्वरीमध्ये घडला. या विरोधात या महिला कर्मचाऱ्याने जोगेश्वरी पोलिसांकडे तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार फैजा शेख (२६) या जोगेश्वरी पश्चिम च्या वैशाली नगर मध्ये शाखा असलेल्या डीसीबी बँकेत ब्रांच सपोर्ट एक्झिक्यूटिव्ह म्हणून काम करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, ९ मे रोजी त्या कामावर असताना दुपारी ३ वाजता त्या त्यांच्या सहकारी महिलेकडे गेल्या होत्या. त्यांनी त्यांचा मोबाईल फोन टेबलवर असलेल्या संगणकाच्या बाजूलाच ठेवला होता. काम संपवून त्या परत आल्या तेव्हा त्यांना त्यांचा मोबाईल सापडला नाही. त्यामुळे बँकेतील इतर कर्मचाऱ्यांकडे त्यांनी चौकशी केली. मात्र त्याबाबत कोणाला काही कल्पना नव्हती. त्यांनी बँकेत आलेल्या लोकांनाही विचारले मात्र फोन सापडला नाही. अखेर या प्रकरणी त्यांनी ओशिवरा पोलिसात तक्रार दिल्यावर अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला.