IND vs AUS : 'शुभमन इधर देख लो'! नागपूर कसोटीपूर्वी शुभमन गिलवर प्रेम करणाऱ्या मुलीचे शहरभर पोस्टर, उमेश यादव म्हणतो... 

India vs Australia Test Series : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या कसोटी मालिकेला ९ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. भारतीय संघ नागपूरला पोहाचला असून सरावालाही लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 12:27 PM2023-02-04T12:27:41+5:302023-02-04T12:38:54+5:30

whatsapp join usJoin us
'Shubman ab toh dekh le': Senior Indian pacer Umesh Yadav has poked fun at star batter Shubman Gill after woman's proposal goes viral  | IND vs AUS : 'शुभमन इधर देख लो'! नागपूर कसोटीपूर्वी शुभमन गिलवर प्रेम करणाऱ्या मुलीचे शहरभर पोस्टर, उमेश यादव म्हणतो... 

IND vs AUS : 'शुभमन इधर देख लो'! नागपूर कसोटीपूर्वी शुभमन गिलवर प्रेम करणाऱ्या मुलीचे शहरभर पोस्टर, उमेश यादव म्हणतो... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia Test Series : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या कसोटी मालिकेला ९ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. भारतीय संघ नागपूरला पोहाचला असून सरावालाही लागला आहे. पण, भारत-न्यूझीलंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० सामन्यात प्रसिद्ध झालेल्या एका मुलीचे पोस्टर नागपूर शहरात रस्त्यांरस्त्यांवर लागले आहेत. भारताचा जलदगती गोलंदाज अन् नागपूरकर उमेश यादव ( Umesh Yadav) याने यावर भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल ( Shubman Gill) याची फिरकी घेतली आहे.

अजबच! ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयातील स्टार गोलंदाज नेट बॉलर म्हणून भारतीय संघात

२३ वर्षीय शुभमन गिल सध्या तुफान फॉर्मात आहे. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये  शतक झळकावणारा तो भारताचा पाचवा फलंदाज ठरला आहे. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याने कसोटी पदार्पण केले आणि त्यानंतर तो सातत्याने दमदार कामगिरी करतोय. वन डे क्रिकेटमध्ये त्याने ६ सामन्यांत तीन शतकं झळकावली आहेत. १८ जानेवारीला हैदराबाद येथे त्याने न्यूझीलंडविरुद्ध २०८ धावा चोपल्या होत्या. त्यानंतर ट्वेंटी-२० मालिकेतही त्याने शतक झळकावले. 

अहमदाबाद ट्वेटी-२०त त्याने ६३ चेंडूंत १२६ धावांची खेळी केली. भारताकडून ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. या सामन्यात एक मुलगी फार चर्चेत आली होती. तिच्या हाताताली पोस्टरवर, टिंडर शुभमनचे मॅच करादो! असे लिहिले होते. आता तिच्या याच फोटोचे बॅनर नागपूरच्या रस्त्यांवर लागलेले पाहायला मिळता आहेत.  


भारताचा जलदगती गोलंदाज उमेश यादवने नागपूरमध्ये लागलेल्या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.  त्यावर ३५ वर्षीय उमेशने लिहिले की, पूरा नागपूर बोल रहा है, शुभमन गिल अब तो देख ले! 

उमेशने भारताकडून ५४ कसोटींत १६५ विकेट्स घेतल्या आहेत. 

संपूर्ण वेळापत्रक (  Full Schedule)

पहिली कसोटी - ९ ते १३ फेब्रुवारी, नागपूर
दुसरी कसोटी - १७ ते २१ फेब्रुवारी, दिल्ली
तिसरी कसोटी - १ ते ५ मार्च, धर्मशाला 
चौथी कसोटी - ९ ते १३ मार्च, अहमदाबाद

भारत ( पहिल्या दोन कसोटीसाठी)- रोहित शर्मा, लोकेश राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत, सूर्यकुमार यादव.

ऑस्ट्रेलिया- पॅट कमिन्स, ॲश्टन ॲगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स केरी, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, पीटर हँड्सकोम्ब, ट्रॅव्हीस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टोड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, डेव्हिड वॉर्नर

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: 'Shubman ab toh dekh le': Senior Indian pacer Umesh Yadav has poked fun at star batter Shubman Gill after woman's proposal goes viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.