Virat Kohli: चार महिन्यात कोहलीच्या हातून गेली चार संघाची कप्तानी, अशी लिहिली गेली विराट नेतृत्वाच्या एक्झिटची कहाणी

Virat Kohli Test Captaincy: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर विराट कोहलीने भारताच्या कसोटी संघाचं नेतृत्व सोडण्याची घोषणा केली. आता विराट कोहली क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारात भारताचं नेतृत्व करणार नाही. गेल्या चार महिन्यांमध्ये भारताच्या तिन्ही संघांसह आरसीबीचेही कर्णधारपद सोडले आहे.

विराट कोहलीने शनिवारी संध्याकाळी अचानक भारताच्या कसोटी संघाचं नेतृत्व सोडत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याने एक पत्रक प्रसिद्ध करत माहिती दिली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर विराट कोहलीने भारताच्या कसोटी संघाचं नेतृत्व सोडण्याची घोषणा केली. आता विराट कोहली क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारात भारताचं नेतृत्व करणार नाही. गेल्या चार महिन्यांमध्ये भारताच्या तिन्ही संघांसह आरसीबीचेही कर्णधारपद सोडले आहे.

विराट कोहली २०१३ पासून आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचं नेतृत्व करत होता. मात्र २०२१ मध्ये हंगामाच्या ऐन मध्यावर त्याने संघाचं नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. मात्रा या काळात विराट आरसीबीला एकही विजेतेपद मिळवून देऊ शकला नाही. ११ ऑक्टोबर रोजी विराट कोहलीने आरसीबीचा कर्णधार म्हणून आपला शेवटचा सामना खेळला.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वीच विराट कोहलीने तो टी-२० संघाचं नेतृत्व सोडणार असल्याची घोषणा केली होती. आपल्या नेतृत्वाखाली संघाला विश्वविजेतेपद जिंकून द्यायचा त्याचा प्रयत्न होता. मात्र त्यामध्ये त्याला यश मिळालं नाही. तसेच भारतीय संघ सुपर १२ फेरीतच गारद झाला. नोव्हेंबरमध्ये विराटने कर्णधार म्हणून शेवटचा सामना खेळला. दोन महिन्यात दोन संघांमधून विराटला कप्तान म्हणून निरोप मिळाला.

त्यानंतर रोहिल शर्माला टी-२० चा कर्णधार नियुक्त करण्यात आले. मग डिसेंबरमध्ये विराट कोहीलऐवजी रोहित शर्मा एकदिवसीय संघाचा कर्णधार असेल, अशी घोषणा बीसीसीआयने केली. अशाप्रकारे सलग तिसऱ्या महिन्यात विराट कोहलीच्या हातून तिसऱ्या संघाची कप्तानी निसटली.

सन २०२२ च्या सुरुवातीला भारताकडे दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकून इतिहास रचण्याची संधी चालू आली होती. मात्र हातातोंडाशी आलेली ही संधी भारतीय संघाने मोक्याच्या क्षणी केलेल्या सुमार कामगिरीमुळे निसटली. विराट कोहली आता केवळ कसोटी कर्णधार होता. मात्र त्याला संघाला कसोटी मालिका विजय मिळवून देता आला नाही. त्यानंतर अखेरीस शनिवारी विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. अशा प्रकारे विराट कोहली सलग चौथ्या महिन्यात चौथ्या संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला.