Axar Patel Engagement: हातावर अक्षर पटेलच्या नावाचा टॅटू, पाहा कोण आहे टीम इंडियाच्या अष्टपैलूची होणारी पत्नी मेहा

Axar Patel Engagement: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर पटेल याने त्याच्या २८ व्या जन्मदिनी जीवनातील मोठा निर्णय घेतला आहे. अक्षरने आज त्याची गर्लफ्रेंड मेहा हिच्यासोबत साखरपुडा केला. आज आपण जाणून घेऊया की अक्षर पटेलची होणारी पत्नी कोण आहे.

भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू अक्षर पटेल याने त्याच्या २८ व्या जन्मदिनी जीवनातील मोठा निर्णय घेतला आहे. अक्षरने आज त्याची गर्लफ्रेंड मेहा हिच्यासोबत साखरपुडा केला. आज आपण जाणून घेऊया की अक्षर पटेलची होणारी पत्नी कोण आहे.

भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याने आज आपल्या जीवनातील मोठा निर्णय घेतला असून, गर्लफ्रेंड मेहा हिच्यासोबत साखरपुडा केला आहे.

अक्षर आणि मेहा हे दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनीही अखेर या नात्याचे विवाहात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला.

पेशाने डायटिशिनय आणि न्यूट्रिशनिस्ट असलेली मेहाच्या हातावरील एक टॅटू खूप व्हायरल होत आहे. तिच्या या टॅटूवरून भारतीय क्रिकेटपटू जयदेव उनाडकट यानेही तिची थट्टा केली होती.

मेहाने आपल्या हातावर अक्षर पटेलच्या नावाचा टॅटू गोंदवून घेतला आहे. तिने तिच्या हातावर अक्ष असे गोंदवून घेतले आहे.

तिच्या टॅटूच्या एका फोटोवर उनाडकटन कमेंट करताना सांगितले की, यामध्ये पटेलला अॅड करा.

अक्षरने त्याच्या जन्मदिनाच्या पार्टीवेळीच साखरपुडा करण्याचा प्लॅन आधीच ठरवला होता. अक्षरच्या बर्थडे पार्टीमधील फोटोंमधून हे स्पष्टपणे दिसून येते.