Jonny Bairstow IPL 2022 RCB vs PBKS Live Updates : खडे खडे सिक्स!; ७ Six व ३ Four, जॉनी बेअरस्टोची आतषबाजी, २१ चेंडूंत पूर्ण केले अर्धशतक, Video

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून त्यांना प्रथम फलंदाजीचे आव्हान दिले आणि जॉनी बेअरस्टो व शिखर धवन यांनी RCBच्या गोलंदाजांना धु धु धुतले... 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 08:09 PM2022-05-13T20:09:09+5:302022-05-13T20:14:58+5:30

IPL 2022 RCB vs PBKS Live Updates :  Jonny Bairstow brings up his ninth IPL fifty (in JUST 21 balls) with a six, Video  | Jonny Bairstow IPL 2022 RCB vs PBKS Live Updates : खडे खडे सिक्स!; ७ Six व ३ Four, जॉनी बेअरस्टोची आतषबाजी, २१ चेंडूंत पूर्ण केले अर्धशतक, Video

Jonny Bairstow IPL 2022 RCB vs PBKS Live Updates : खडे खडे सिक्स!; ७ Six व ३ Four, जॉनी बेअरस्टोची आतषबाजी, २१ चेंडूंत पूर्ण केले अर्धशतक, Video

Next

IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Punjab Kings Live Updates : तहान लागल्यावर विहीर खोदायला घेणे, हा प्रकार आजच्या लढतीत पंजाब किंग्सच्या बाबतीत घडताना दिसतोय... प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी धडपणाऱ्या पंजाबचे सलामीवीर आज फुल चार्ज होऊनच मैदानावर उतरले.  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून त्यांना प्रथम फलंदाजीचे आव्हान दिले आणि जॉनी बेअरस्टो व शिखर धवन यांनी RCBच्या गोलंदाजांना धु धु धुतले... 
 


बेअरस्टो आज भलत्याच फॉर्मात होता.... उभ्या उभ्या षटकार मारणे, काय असतं हे त्याने आज जोश हेझलवूडला दाखवून दिले. बेअरस्टोने दुसऱ्या षटकात २२ धावा कुटल्या. बेअरस्टो व धवन यांनी ३.५ षटकांत फलकावर ५० धावा चढवल्या. RCB च्या प्रमुख गोलंदाजांन जिथे अपयश आले, तिथे ग्लेन मॅक्सवेलने कमाल केली. ५व्या षटकात त्याने ही PBKSला पहिला धक्का दिला. धवनला ( २१) मॅक्सवेलने त्रिफळाचीत करून ६० धावांवर पंजाबला धक्का दिला. बेअरस्टोची फटकेबाजी काही थांबली नाही. त्याने मोहम्मद सिराजच्या पुढच्याच षटकात चार खणखणीत षटकात खेचले आणि २१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत ७ षटकार व ३ चौकारांचा समावेश होता. पंजाबने पहिल्या सहा षटकांत १ बाद ८३ धावा कुटल्या.  ( पाहा IPL 2022 - RCB vs PBKS सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - अव्वल चार संघांच्या शर्यतीत RCBही आघाडीवर आहे. त्यांच्या खात्यात १४ गुण आहेत आणि उर्वरित दोन सामन्यांतील विजय त्यांचे स्थान पक्के करेल. त्यांना एक विजयही पुरेसा आहे, पण पुन्हा गणित इतरांच्या कामगिरीवर अवलंबून राहते.

पंजाब किंग्स - ११ सामन्यांत ५ विजय व १० गुणांसह हा संघ अजूनही शर्यतीत आहे, परंतु त्यांचे चान्सेस फार कमी आहेत. उर्वरित तीन सामने जिंकण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा पर्याय नाही.
 

Web Title: IPL 2022 RCB vs PBKS Live Updates :  Jonny Bairstow brings up his ninth IPL fifty (in JUST 21 balls) with a six, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app