IND vs SA, 1st ODI Live Updates : बऱ्याच कालावधीनंतर आम्ही वन डे खेळतोय...; टीम इंडियाचा कर्णधार लोकेश राहुलनं सांगितलं पराभवाचं कारण 

India vs South Africa, 1st ODI Live Updates : लोकेश राहुलच्या ( KL Rahul) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 10:51 PM2022-01-19T22:51:02+5:302022-01-19T22:51:52+5:30

IND vs SA, 1st ODI Live Updates : KL Rahul said, "we haven't played ODI for a while, we've the T20 World Cup in our mind. We'll make mistakes, but we'll learn from them". | IND vs SA, 1st ODI Live Updates : बऱ्याच कालावधीनंतर आम्ही वन डे खेळतोय...; टीम इंडियाचा कर्णधार लोकेश राहुलनं सांगितलं पराभवाचं कारण 

IND vs SA, 1st ODI Live Updates : बऱ्याच कालावधीनंतर आम्ही वन डे खेळतोय...; टीम इंडियाचा कर्णधार लोकेश राहुलनं सांगितलं पराभवाचं कारण 

Next

India vs South Africa, 1st ODI Live Updates : लोकेश राहुलच्या ( KL Rahul) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेच्या ४ बाद २९६ धावांचा पाठलाग करताना भारताला ८ बाद २६५ धावा करता आल्या. शिखर धवन, विराट कोहली आणि शार्दूल ठाकूर यांनी अर्धशतकी खेळी करून संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.  

दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या तीन विकेट्स ६८ धावांवर पडल्यानंतर कर्णधार टेम्बा बवुमा ( Temba Bavuma ) व रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( Rassie van der Dussen) यांनी चौथ्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली. टेम्बा बवुमा १४३ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीनं ११० धावांवर लोकेश राहुलच्या हाती झेल देऊन माघारी परतला. बवुमानं चौथ्या विकेटसाठी ड्यूसेनसह २०४ धावांची भागीदारी केली. भारताविरुद्धची आफ्रिकन खेळाडूंची ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी २००० साली हर्षल गिब्स व गॅरी कर्स्टन यांनी २३५ धावा जोडल्या होत्या. ड्यूसेन ९६ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारासह १२९ धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेनं ४ बाद २९६ धावांचा डोंगर उभा केला.  

लोकेश राहुल व शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या.  विराट व धवन ही जोडी दक्षिण आफ्रिकेसाठी डोकेदुखी ठरताना दिसत होती. धवननं ८४ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीनं ७९ धावा केल्या. विराटही चांगला खेळला, पंरतु तब्रेज शम्सीनं त्याला माघारी पाठवले. त्यानंही ६३ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीनं ५१ धावा केल्या. धवन व विराटनं दुसऱ्या विकेटसाठी १०२ चेंडूंत  ९४ धावांची भागीदारी केली. त्यानंतर श्रेयस अय्यर ( १७), रिषभ पंत( १६) वेंकटेश अय्यर (२) आणि आर अश्विन ( ७) झटपट माघारी परतले. भुवनेश्वर कुमार ४ धावांवर माघारी परतला. 

शार्दूल ठाकूर अखेरपर्यंत संघर्ष करताना ४३ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५० धावांवर नाबाद राहिला. शार्दूलनं ९व्या विकेटसाठी जसप्रीत बुमराहसह अर्धशतकी भागीदारी केली. शार्दूल भारताला ८ बाद २६५ धावाच करता आल्या आणि आफ्रिकेनं ३१ धावांनी सामना जिंकला. लुंगी एनगिडी ( २-६४) तब्रेज शम्सी ( २-५२), अँडीले फेहलुकवायो ( २-२६) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

लोकेश राहुल काय म्हणाला?
''आम्ही चांगली सुरुवात केली आणि मधल्या फळीत विकेट घेऊ शकलो नाही. मी २० षटकानंतर फलंदाजी करू शकलो नाही, त्यामुळे खेळपट्टीबाबत मी सांगू शकत नाही. पण, विराट व शिखर यांनी सांगितले की एकदा का तुम्ही स्थिरावलात की खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती. दुर्दैवानं मधल्या फळीत भागीदारी करू शकलो नाही. बराच कालावधी आम्ही वन डे क्रिकेट खेळलेलो नाही, आमच्या डोक्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आहे. आम्ही चुका केल्या, परंतु त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतोय,''असे लोकेश म्हणाला.
 

Web Title: IND vs SA, 1st ODI Live Updates : KL Rahul said, "we haven't played ODI for a while, we've the T20 World Cup in our mind. We'll make mistakes, but we'll learn from them".

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app