MS Dhoni, Land Rover 3: महेंद्रसिंग धोनीनं खरेदी केली 'विंटेज लँड रोवर-३'; क्लासिक लूक पाहून तुम्हीही म्हणाल... क्या बात है!

MS Dhoni, Land Rover 3: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग मैदानातील विक्रमांसोबतच त्याच्या बाइक आणि कार प्रेमासाठी देखील ओळखला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 08:42 PM2022-01-18T20:42:40+5:302022-01-18T20:43:22+5:30

Former Indian cricket Team captain MS Dhoni added vintage Land Rover 3 to his collection wins online auction | MS Dhoni, Land Rover 3: महेंद्रसिंग धोनीनं खरेदी केली 'विंटेज लँड रोवर-३'; क्लासिक लूक पाहून तुम्हीही म्हणाल... क्या बात है!

MS Dhoni, Land Rover 3: महेंद्रसिंग धोनीनं खरेदी केली 'विंटेज लँड रोवर-३'; क्लासिक लूक पाहून तुम्हीही म्हणाल... क्या बात है!

Next

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग मैदानातील विक्रमांसोबतच त्याच्या बाइक आणि कार प्रेमासाठी देखील ओळखला जातो. गेल्या महिन्यात बिग बॉय टॉइज आयोजित एका लिलाव कार्यक्रमात सहभाग घेतल्यानंतर धोनीनं आता आपल्या गॅरेजमध्ये एक विंटेज लँड रोवर-३ कार दाखल केली आहे. गुरूग्राममध्ये बिग बॉय टॉइजच्या शो-रुममध्ये ऑनलाइन लिलावासाठी अनेक विंटेज मॉडल विक्रीसाठी उपलब्ध होत्या. महेंद्रसिंग धोनीनं लँड रोवर-३ रस दाखवला आणि यासाठीची बोली देखील जिंकली. 

बीबीटीच्या माहीतीनुसार, ५० टक्क्यांहून अधिक स्टॉकचा ऑनलाइन पद्धतीनं लिलाव करण्यात आला. आपल्या वैयक्तिक कलेक्शनमध्ये धोनीनं आजवर अनेक आलिशान कार आणि बाइक्सचा समावेश केला आहे. यात ऑडी क्यू-७, मर्सिडिज बेंझ जीएलई आणि जीप ग्रँड चेरोकी ट्रॅकहॉकसारख्या लग्जरी कारचा समावेश आहे. याशिवाय धोनीचं बाइक प्रेम तर सर्वश्रृत आहे. धोनीकडे यामाहा 350, कॉन्फेडरेट हेलकॅट एक्स 32, बीएसए गोल्ड स्टार, हार्ले-डेविडसन फॅटबॉय, कावासाकी निंजा ZX14R आणि कावासाकी निंजा H2 सारख्या बाइक्सचा समावेश आहे. 

लिलावात सामील होत्या १९ स्पेशल कार
बीबीटी भारत देशातील पहिल्या ऑटोमोबाइल कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. यामाध्यमातून आतापर्यंत विंटेज आणि क्लासिक कारचा ऑनलाइन पद्धतीनं लिलाव करण्यात आला आहे. ई-लिलावाची माहिती ८ जानेवारी २०२२ रोजी जाहीर करण्यात आली होती. यात बिग बॉय टॉइजनं लिलावासाठी १९ स्पेशल कारची यादी जाहीर केली होती. यात रोल्स रॉइस, कॅडिलॅक, ब्यूक, शेवरलेट, लँड रोवर, ऑस्टिन, मर्सिडिज-बेंज आणि इतर काही कारचा समावेश आहे. 

Web Title: Former Indian cricket Team captain MS Dhoni added vintage Land Rover 3 to his collection wins online auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app