८ चौकार, ७ षटकार; यशस्वी जैस्वालची सेंच्युरी! मुंबई इंडियन्सवर एकटा भारी, राजस्थान रॉयल्स लैय भारी 

अखेर यशस्वी जैस्वालला ( Yashasvi Jaiswal) सूर गवसला आणि त्याने शतकी खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 11:35 PM2024-04-22T23:35:17+5:302024-04-22T23:43:03+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 , Rajasthan Royals  vs Mumbai Indians Live : century by Yashasvi Jaiswal, scored 100 in 59 balls with 8 fours and 7 sixes, Video  | ८ चौकार, ७ षटकार; यशस्वी जैस्वालची सेंच्युरी! मुंबई इंडियन्सवर एकटा भारी, राजस्थान रॉयल्स लैय भारी 

८ चौकार, ७ षटकार; यशस्वी जैस्वालची सेंच्युरी! मुंबई इंडियन्सवर एकटा भारी, राजस्थान रॉयल्स लैय भारी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 , Rajasthan Royals  vs Mumbai Indians Live Marathi : अखेर यशस्वी जैस्वालला ( Yashasvi Jaiswal) सूर गवसला आणि त्याने आयपीएल २०२४ मधील त्याच्या पहिल्या अर्धशतकाचे शतकात रुपांतर केले. मुंबई इंडियन्सच्या १८० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या राजस्थान रॉयल्ससाठी यशस्वीने शतक झळकावले आणि संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले. 



Impact player जॉस बटलर व यशस्वी जैस्वाल यांनी RR ला सकारात्मक सुरुवात करून दिली. त्यांनी पॉवर प्लेमध्ये ६१ धावा उभ्या केल्या. कमकुवत गोलंदाजी ही MI साठी पुन्हा डोकेदुखी ठरताना दिसली. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवला गेला आणि डकवर्थ लुईस नियमानुसार RR २० धावांनी पुढे होते. पावसानंतर यशस्वीचे सुरेख ड्राईव्ह पाहायला मिळाले. पण, पियुष चावलाने अनुभवाच्या जोरावर मुंबईला पहिली विकेट मिळवून दिली. त्याने जॉस बटलरला ३५ ( २५ चेंडू, ६ चौकार) धावांवर बाद करून RR ला ७४ धावांवर धक्का दिला. यशस्वीने ३१ चेंडूंत यंदाच्या पर्वातील त्याचे पहिले अर्धशतक पूर्ण केले.

पियुषच्या गोलंदाजीवर यशस्वीने उत्तुंग फटका खेचला अन् नेहालला तो टिपता आला असता तर मुंबईला मोठी विकेट मिळाली असती. पण, सीमारेषेवर त्याने झेल टाकला अन् RR ला षटकार मिळाला. त्यांनी १० षटकांत १ बाद ९५ धावा केल्या होत्या. मोहम्मद नबीकडून MI ला अपेक्षित गोलंदाजी होताना दिसली नाही आणि यशस्वी व संजू सॅमसनने ११व्या षटकात दोन खणखणीत षटकार खेचले. टीम डेव्हिडने १३व्या षटकात संजूचा सोपा झेल टाकला. यशस्वी आज भलत्याच फॉर्मात होता आणि त्याने जसप्रीत बुमराह यालाही उत्तुंग षटकार खेचला. यशस्वीने ५९ चेंडूंत ८ चौकार व ७ षटकारांसह शतक पूर्ण केले. 
 

Web Title: IPL 2024 , Rajasthan Royals  vs Mumbai Indians Live : century by Yashasvi Jaiswal, scored 100 in 59 balls with 8 fours and 7 sixes, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.