IPL 2024 LSG vs CSK: ऋतुराजसेनेला लखनौच्या नवाबांचे आव्हान; गोलंदाज ठरणार निर्णायक!

Lucknow Super Giants vs Chennai Super Kings: आज ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नई आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 11:42 AM2024-04-19T11:42:55+5:302024-04-19T11:43:15+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 LSG vs CSK Lucknow Super Giants and Chennai Super Kings match | IPL 2024 LSG vs CSK: ऋतुराजसेनेला लखनौच्या नवाबांचे आव्हान; गोलंदाज ठरणार निर्णायक!

IPL 2024 LSG vs CSK: ऋतुराजसेनेला लखनौच्या नवाबांचे आव्हान; गोलंदाज ठरणार निर्णायक!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लखनौ : मुंबई इंडियन्सला पराभूत करून चेन्नई सुपर किंग्जने लखनौ गाठले. शुक्रवारी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नई आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होत आहे. लखनौचा संघ आपल्या घरच्या मैदानावर चेन्नईचा सामना करणार आहे. या लढतीत लखनौसमोर चेन्नईच्या गोलंदाजांचे कडवे आव्हान असणार आहे. इकाना स्टेडियमच्या खेळपट्टीवर चेन्नईचे गोलंदाज वर्चस्व गाजवू शकतात.

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली आणि महेंद्रसिंह धोनीकडून प्रेरणा घेतलेला चेन्नईचा संघ मागील दोन लढतींमध्ये विजयी ठरला आहे. तर के. एल. राहुलच्या लखनौ संघाला सलग दोन पराभवांचा सामना करावा लागला आहे. लखनौचे फलंदाज अपेक्षेनुसार कामगिरी करू शकलेले नाहीत. फाॅर्मात असलेल्या चेन्नईच्या गोलंदाजांचा सामना ते कसे करतात हे पाहणे उत्सुकतेचे आहे. चेन्नईसाठी गेल्या सामन्यात मथिशा पाथीरानाने शानदार गोलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीचा लखनौच्या फलंदाजांना तोड शोधावा लागेल.

लखनौचा संघ -
- सलामीवीर क्विंटन डीकाॅक आणि लोकेश राहुल संघाला चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरत आहेत. या दोघांनाही कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे.
- आक्रमक फलंदाज निकोलस पूरनला कामगिरीत सातत्य राखावे लागणार आहे. सहा सामन्यांत त्याने १९ षट्कार लगावले आहेत.
- युवा वेगवान गोलंदाज मयंक यादव मांसपेशी ताणल्यामुळे दोन सामन्यांमध्ये खेळू शकलेला नाही. चेन्नईविरुद्ध तो खेळल्यास लखनौला फायदा होईल.
- यश ठाकूर, कृणाल पांड्या, नवीन उल हक, रवी बिश्नोई हे गाेलंदाज काही सामन्यांत प्रभावी ठरले तर काही सामन्यांत अपयशी ठरले आहेत. 

चेन्नईचा संघ -
- रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड सलामीला प्रभावी ठरत आहेत. दोघांकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा आहे.
- युवा फलंदाज शिवम दुबे शानदार फाॅर्मात आहे. डेरिल मिचेलही धावा करत आहे. महेंद्रसिंह धोनीने मुंबईविरुद्ध आक्रमक फलंदाजी केली होती. अखेरच्या षटकांत येऊन धोनी शानदार कामगिरी करत आहे हे चेन्नईसाठी फायद्याचे ठरत आहे. 
- मथिशा पथीराना, मुस्तफिझूर रहमान, रवींद्र जडेजा, तुषार देशपांडे हे गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखण्याचे काम प्रभावीपणे करत आहेत.
- रवींद्र जडेजा, समीर रिझवी यांना अखेरच्या षटकांत फलंदाजीत चमक दाखवावी लागणार आहे.

Web Title: IPL 2024 LSG vs CSK Lucknow Super Giants and Chennai Super Kings match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.