IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

IPL 2024 GT vs RCB Live Match Updates: गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडे आव्हान दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2024 05:19 PM2024-04-28T17:19:57+5:302024-04-28T17:20:04+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 GT vs RCB Live Match Updates In Marathi Gujarat Titans set Royal Challengers Bangalore 201 run target for victory, Sai Sudarshan scored 84 | IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 GT vs RCB Live Match Updates In Marathi | अहमदाबाद : साई सुदर्शन आणि शाहरूख खान या युवा भारतीय शिलेदारांच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने आरसीबीला तगडे लक्ष्य दिले. आयपीएलच्या सतराव्या हंगामातील ४५ वा सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून यजमान गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यजमानांनी सावध खेळी करत डाव सावरला. शाहरूख खान आणि साई सुदर्शन यांनी अर्धशतकी खेळी करून आरसीबीला चोख प्रत्युत्तर दिले.

शाहरूखला आयपीएलमधील आपले पहिले अर्धशतक झळकावण्यात यश आले. त्याने ३० चेंडूत ५८ धावांची स्फोटक खेळी केली. (IPL 2024 News) गुजरातकडून वृद्धिमान साहा (५), शुबमन गिल (१६) आणि शाहरूख खानने (५८) धावा केल्या, तर साई सुदर्शन (नाबाद ८४ धावा) आणि डेव्हिड मिलरने नाबाद २६ धावा केल्या. अखेर गुजरातने निर्धारित २० षटकांत ३ बाद २०० धावा केल्या. सुदर्शनने ४ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ४९ चेंडूत ८४ धावांची अप्रतिम खेळी केली. 

कर्णधार शुबमन गिल आणि वृद्धीमान साहा स्वस्तात बाद झाल्यानंतर सुदर्शन आणि शाहरूख यांनी मोर्चा सांभाळला. दोघांनीही स्फोटक खेळी करत पाहुण्या संघाला घाम फोडला. शाहरूखने ५ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ३० चेंडूत ५८ धावा कुटल्या. पण, त्याला मोहम्मद सिराजच्या अप्रतिम चेंडूमुळे या खेळीच्या मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही. मग सुदर्शनने आपला अप्रतिम खेळ सुरू ठेवत संघाच्या २०० धावांच्या दिशेने कूच केली. आरसीबीकडून स्वप्निल सिंग, मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सेवल यांना प्रत्येकी १-१ बळी मिळाला. 

गुजरातचा संघ -
शुबमन गिल (कर्णधार), वृद्धीमान साहा, साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, अजमतुल्लाह उमरजई, राहुल तेवतिया, शाहरूख खान, राशिद खान, साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा.

बंगळुरूचा संघ -
फाफ डुप्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, दिनेश कार्तिक, स्वप्निल सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, यश दयाल.

Web Title: IPL 2024 GT vs RCB Live Match Updates In Marathi Gujarat Titans set Royal Challengers Bangalore 201 run target for victory, Sai Sudarshan scored 84

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.