GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य

IPL 2024 GT vs CSK Live Match : गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सला तगडे आव्हान दिले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 09:13 PM2024-05-10T21:13:49+5:302024-05-10T21:21:43+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 GT vs CSK Live Match Updates In Marathi Gujarat Titans have given Chennai Super Kings a target of 232 runs to win | GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य

GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2024 GT vs CSK Live Match Updates In Marathi । अहमदाबाद : कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर गुजरातने तगडी धावसंख्या उभारली. गुजजरात टायटन्सचा संघ आज 'करा किंवा मरा'चा सामना खेळत आहे. साई सुदर्शन (१०३) आणि शुबमन गिल (१०४) धावा करून तंबूत परतले. त्यानंतर अखेरच्या काही षटकांमध्ये पाहुण्या चेन्नईने पुनरागमन केले. गुजरातने निर्धारित २० षटकांत ३ बाद २३१ धावा केल्या असून, चेन्नईला विजयासाठी २३२ धावांची गरज आहे.

साई सुदर्शन आणि शुबमन गिल या दोघांनीही शतकी खेळी करून आपल्या संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. गिल पाठोपाठ सुदर्शनने देखील शतकाला गवसणी घातली. बळी घेण्यासाठी तरसलेल्या चेन्नईला अखेर १८ व्या षटकात साई सुदर्शनच्या रूपात पहिला बळी मिळाला. त्याला तुषार देशपांडेने बाद केले. ७ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने सुदर्शनने अवघ्या ५१ चेंडूत १०३ धावा कुटल्या, तर शुबमनने ५० चेंडूत शतक पूर्ण केले. आयपीएलच्या इतिहासातील १०० वे शतक म्हणून गिलच्या अप्रतिम खेळीची नोंद झाली आहे. गिलने ५५ चेंडूत ६ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या.

आयपीएलच्या सतराव्या हंगामातील ५९ व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमनेसामने आहेत. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी गुजराजचा विजय एक सुखद धक्का देणारा असेल. पण चेन्नईच्या विजयाने त्यांची डोकेदुखी वाढणार आहे. १२ गुणांसह चेन्नईचा संघ चौथ्या स्थानावर तर ८ गुणांसह गुजरात तळाशी आहे. (GT vs CSK live Score IPL 2024) आजच्या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

गुजरातचा संघ -
शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, शाहरूख खान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा, कार्तिक त्यागी. 

चेन्नईचा संघ -
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, डेरिल मिचेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग. 

Web Title: IPL 2024 GT vs CSK Live Match Updates In Marathi Gujarat Titans have given Chennai Super Kings a target of 232 runs to win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.