MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

MS Dhoni Six, IPL 2024 CSK vs RCB: धोनीने शेवटच्या षटकात पहिल्याच चेंडूवर मारलेला षटकार RCBच्या पथ्यावर पडला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 11:11 AM2024-05-19T11:11:27+5:302024-05-19T11:16:09+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2024 CSK vs RCB MS Dhoni 110 meter longest six video becomes reason for their loss as rcb wins with new ball | MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MS Dhoni Six, IPL 2024 CSK vs RCB: यंदाच्या स्पर्धेत 8 पैकी 7 सामने गमावलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दमदार पुनरागमन करत प्ले-ऑफ्सचे तिकीट मिळवले. अतिशय दडपणाच्या सामन्यात त्यांनी गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला धूळ चारली. शेवटच्या साखळी सामन्यात बेंगळुरूने चेन्नईचा 27 धावांनी पराभव केला तर केलाच, पण त्यासोबतच प्लेऑफचे समीकरणही जुळवून आणले. पावसामुळे सामन्यात थोडासा खंड पडला होता. पण अखेर सामना झाला, तो २०व्या षटकापर्यंत गेला. शेवटच्या षटकाचा एक्सपर्ट महेंद्रसिंग धोनी मैदानात होता. त्याने षटकारही लगावला. पण तोच षटकार चेन्नईच्या संघासाठी घातक ठरला. कसा ते जाणून घेऊया.

प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी बेंगळुरूला या सामन्यात चेन्नईला किमान 18 धावांनी पराभूत करणे आवश्यक होते. प्रथम फलंदाजी करताना RCB ने 218 धावा केल्या. यानंतर चेन्नईकडून धोनी आणि रवींद्र जाडेजा यांनी उत्कृष्ट भागीदारी रचून संघाला पात्रतेच्या जवळ आणले. पावसाळी वातावरण आणि ओले मैदान यामुळे चेंडू गोलंदाजांच्या हातून निसटत होता. लॉकी फर्ग्युसनकडून दोन वेळा गोलंदाजी करताना चेंडू फलंदाजाला बीमर गेला. तसेच विराट आणि फाफ देखील पंचांना चेंडू बदलून देण्याची मागणी करताना दिसले. पण चेंडू बदलून देण्यात आला नाही. तशातच चेन्नईला शेवटच्या षटकात 17 धावा करायच्या होत्या. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धोनीने मारलेला षटकार चेन्नईला भारी पडला.

धोनीचा षटकार RCBच्या पथ्यावर!

धोनी 20व्या षटकात पहिल्या चेंडूवर यश दयालला लाँग लेग बाऊंड्रीवरून षटकार मारला. चेंडू 110 मीटर लांब गेला. इतकेच नव्हे तर चेंडू स्टेडियमच्या छतावरून बाहेर गेला. त्यामुळे नवा चेंडू आणावा लागला. नवा चेंडू आला तेव्हा 5 चेंडूत फक्त 11 धावांची गरज होती. अशा स्थितीत पंचांना दुसरा चेंडू बोलावणे भाग पडले आणि हे दयालसाठी फायदेशीर ठरले. आधीचा चेंडू ओला होऊ लागला होता, जो गोलंदाजीसाठी कठीण होता. चेंडू बदलण्याचे RCBचे अपीलही अंपायरने फेटाळून लावले होते. पण बदललेला चेंडू पूर्णपणे कोरडा होता. त्यामुळे यश दयालला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत स्लोअर बॉल आणि यॉर्करचा अचूक मारा करता आला. त्याचाच फायदा RCB ला शेवटच्या 5 चेंडूत झाला.

Web Title: IPL 2024 CSK vs RCB MS Dhoni 110 meter longest six video becomes reason for their loss as rcb wins with new ball

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.