R Ashwin IPL 2022 LSG vs RR Live Updates : अहो, हे काय केलंत!; आर अश्विनची खेळपट्टीवरील 'चूक' पाहून पत्नी Prithi Narayanan ची रिअ‍ॅक्शन व्हायरल, Video 

१८व्या षटकात एक घोळ झालेला पाहायला मिळाला आणि जिमी निशॅमला माघारी जावे लागले. आर अश्विनमुळे ( R Ashwin ) हा घोळ झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 09:39 PM2022-05-15T21:39:23+5:302022-05-15T21:39:42+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2022 LSG vs RR Live Updates : James Neesham run out, R Ashwin make a mistake, his wife Prithi Narayanan reaction goes viral, Video  | R Ashwin IPL 2022 LSG vs RR Live Updates : अहो, हे काय केलंत!; आर अश्विनची खेळपट्टीवरील 'चूक' पाहून पत्नी Prithi Narayanan ची रिअ‍ॅक्शन व्हायरल, Video 

R Ashwin IPL 2022 LSG vs RR Live Updates : अहो, हे काय केलंत!; आर अश्विनची खेळपट्टीवरील 'चूक' पाहून पत्नी Prithi Narayanan ची रिअ‍ॅक्शन व्हायरल, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IPL 2022, Lucknow Super Giants vs Rajasthan Royals : जोस बटलर अपयशी ठरला असला तरी राजस्थान रॉयल्सचा ( RR ) डाव यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल व संजू सॅमसन यांनी सावरला. रवी बिश्नोईने २ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. RR ने लखनौ सुपर जायंट्ससमोर आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. १८व्या षटकात एक घोळ झालेला पाहायला मिळाला आणि जिमी निशॅमला Run Out होऊन माघारी जावे लागले. आर अश्विनमुळे ( R Ashwin ) हा घोळ झाला आणि मैदानावरील हा प्रकार पाहून त्याची पत्नी प्रीथि नारायणन ( Prithi Narayanan ) हिच्या चेहऱ्यावर अहो हे काय केलंत? असेच भाव होते. 

जोस बटलर ( २) लगेच माघारी परतल्यानंतर यशस्वी जैस्वाल व कर्णधार संजू सॅमसन यांनी डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४० चेंडूंत ६४ धावांची भागीदारी केली. संजूने ६ चौकारांच्या मदतीने २४ चेंडूंत ३२ धावा केल्या. यशस्वीने २९ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ४१ धावा केल्या. रवी बिश्नोईने १४व्या षटकात देवदत्त पडिक्कलची ( ३९ धावा, १८ चेंडू) विकेट घेतली. रियान पराग व जिमी निशॅम यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. पण, बिश्नोईच्या गोलंदाजीवर परागचा ( १९) अप्रतिम झेल मार्कस स्टॉयनिसने टिपला. त्याच षटकात आर अश्विन व निशॅम यांच्यात समन्वयाचा अभाव जाणवला आणि निशॅमला ( १४) धावबाद होऊन माघारी जावे लागले. ट्रेंट बोल्ट ( १७*) व अश्विन ( १०*) यांनी राजस्थानला ६ बाद १७८ धावा उभ्या करून दिल्या.  ( पाहा IPL 2022 - LSG vs RR सामन्याचे लाईव्ह स्कोअरकार्ड )

१८व्या षटकात काय घडले?
बिश्नोईने टाकलेला चेंडूवर अश्विनने हलका फटका मारला अन् धाव घेण्यासाठी तो पुढे आला. मात्र, तो थांबला आणि निशॅमला माघारी जाण्यास सांगितले. तोपर्यंत नॉन स्ट्रायकर एंडवर असलेल्या निशॅमने बराच पुढे आला होता आणि बिश्नोईने रन आऊट केले. हा गोंधळ पाहून अश्विनच्या पत्नीने चेहरा लपवला.



 

Web Title: IPL 2022 LSG vs RR Live Updates : James Neesham run out, R Ashwin make a mistake, his wife Prithi Narayanan reaction goes viral, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.