T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

India vs Pakistan, T20 World Cup 2024 : ९ जून रोजी भारत आणि पाकिस्तान असा सामना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2024 03:46 PM2024-05-05T15:46:34+5:302024-05-05T15:48:21+5:30

whatsapp join usJoin us
ind vs pak Pakistan young spinner abrar ahmed said, My dream is to take the wicket of Virat Kohli in t20 world cup 2024 | T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2024 : भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी केवळ आयसीसी आणि आशिया चषकाच्या स्पर्धेत आमनेसामने येतात. आता पुन्हा एकदा ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या बहाण्याने हे प्रतिस्पर्धी भिडणार आहेत. न्यूयॉर्कच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ९ जून रोजी भारत आणि पाकिस्तान असा सामना होणार आहे. या सामन्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. अशातच पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमदने भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहलीला बाद करण्याचे स्वप्न बाळगले आहे. 

अबरारने २०२२ मध्ये इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतून पाकिस्तानी संघात पदार्पण केले. पाकिस्तानने आयर्लंड आणि इंग्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. ही शेजाऱ्यांची विश्वचषकाची तयारी असेल. अबरार पाकिस्तानच्या विश्वचषकाच्या संघात असण्याची दाट शक्यता आहे. स्थानिक माध्यमांशी बोलताना अबरार म्हणाला की, मी प्रत्येक सामन्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. आमच्या संघात चांगले फिरकीपटू आहेत. प्रत्येक सामना जिंकण्यावर आमचा भर असेल. विश्वचषक जिंकण्याचे आमचे ध्येय असले तरी विराट कोहलीला बाद करणे हे माझे स्वप्न आहे. 

विश्वचषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह 
राखीव खेळाडू - शुबमन  गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद 

विश्वचषकासाठी पात्र ठरलेले संघ - 
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा. 

विश्वचषकासाठी चार गट - 
अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ

Web Title: ind vs pak Pakistan young spinner abrar ahmed said, My dream is to take the wicket of Virat Kohli in t20 world cup 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.