BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा

बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यात सध्या ट्वेंटी-२० मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 08:33 PM2024-05-10T20:33:57+5:302024-05-10T20:36:11+5:30

whatsapp join usJoin us
ban vs zim 4th t20i match funny fielding by Zimbabwe against Bangladesh, watch here video | BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा

BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

BAN vs ZIM 4th T20I : बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यात सध्या ट्वेंटी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षणादरम्यान केलेली चूक सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. गल्ली क्रिकेटमध्ये घडावा असा प्रसंग आंतरराष्ट्रीय सामन्यात घडला. झिम्बाब्वेच्या शिलेदारांनी मैदानात असे काही क्षेत्ररक्षण केले की सर्वांनाच हसू आले. बांगलादेशच्या फलंदाजाला बाद करण्याची सुवर्णसंधी असताना झिम्बाब्वेच्या चुकीमुळे त्याला जीवनदान मिळाले. 

खरे तर झाले असे की, फलंदाजाने फटका मारताच धाव काढण्यासाठी दुसऱ्या टोकाकडे कूच केली. यामध्ये दोन्ही फलंदाजांचा ताळमेळ बिघडतो. पण अखेर ते धाव पूर्ण करतात. मात्र, गोलंदाजाने स्टम्पवर चेंडू मारला अन् चेंडू दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडे गेला. तितक्यात बांगलादेशने आणखी धाव काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र झिम्बाब्वेच्या क्षेत्ररक्षकांना धावबाद करण्याची आयती संधी चालून आली. पण, स्टम्पच्या अगदी जवळ असताना देखील त्याचा निशाणा चुकला.

तत्पुर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने चांगली सुरुवात केली. तन्जीद हसन आणि सौम्य सरकार यांच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशने पकड बनवली. या सलामी जोडीने पहिल्या बळीसाठी १०१ धावा जोडल्या. तन्जीद (५२) आणि सरकार (४१) धावा करून तंबूत परतले. पण, ही जोडी बाद झाल्यानंतर बांगलादेशचा डाव कोलमडला अन् केवळ १४३ धावांत संघ गारद झाला. 

Web Title: ban vs zim 4th t20i match funny fielding by Zimbabwe against Bangladesh, watch here video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.