Axar Patel, IPL 2022 PBKS vs DC Live: मयंक अग्रवालचा विचित्र खेळ; अक्षर पटेलने केली दांडी गुल, नावावर झाला मोठा विक्रम

मयंकला काही कळायच्या आत उडाला त्रिफळा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 10:45 PM2022-05-16T22:45:56+5:302022-05-16T22:47:38+5:30

whatsapp join usJoin us
Axar Patel clean Bowled Punjab Captain Mayank Agarwal completes 100 wickets in IPL Career IPL 2022 PBKS vs DC | Axar Patel, IPL 2022 PBKS vs DC Live: मयंक अग्रवालचा विचित्र खेळ; अक्षर पटेलने केली दांडी गुल, नावावर झाला मोठा विक्रम

Axar Patel, IPL 2022 PBKS vs DC Live: मयंक अग्रवालचा विचित्र खेळ; अक्षर पटेलने केली दांडी गुल, नावावर झाला मोठा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Axar Patel, IPL 2022 PBKS vs DC: मिचेल मार्शच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीच्या संघाने २० षटकांत १५९ धावा केल्या. दिल्लीचा भरवशाचा डेव्हिड वॉर्नर शून्यावर गेल्यानंतर मिचेल मार्शने दमदार ६३ धावा करत संघाला १५०पार मजल मारून दिली. दिल्लीचा डाव मोठा होऊ न देण्यासाठी पंजाबकडून अर्शदीप सिंग आणि लिव्हिंगस्टोनने सर्वाधिक ३-३ बळी टिपले. त्यानंतर पंजाबच्या डावात दिल्लीच्या अक्षर पटेलने पंजाबचा हुकुमी एक्का कर्णधार मयंक अग्रवालला क्लीन बोल्ड करत एक पराक्रम केला.

दिल्लीने दिलेल्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जॉनी बेअरस्टोने दमदार सुरूवात करून दिली होती. पण धावगती वाढवत असताना १५ चेंडूत २८ धावांवर तो माघारी परतला. त्यानंतर इतर फलंदाजांनी प्रचंड निराशा केली. शिखर धवन (१९), भानुका राजपक्षे (४), लियम लिव्हिंगस्टोन (३), हरप्रीत ब्रार (१) साऱ्यांनीच झटपट विकेट्स बहाल केल्या. कर्णधार म्हणून जबाबदारीने खेळ अपेक्षित असलेल्या मयंक अग्रवालचा विचित्र फटका खेळताना अक्षर पटेलने त्रिफळा उडवला. ही विकेट घेत अक्षर पटेलने आपल्या १०० IPL विकेट्स पूर्ण केल्या.

--

मयंकची विकेट, पाहा व्हिडीओ-

दिल्लीचा संघ- डेव्हिड वॉर्नर, सरफराज खान, मिचेल मार्श, रिषभ पंत, ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिक नॉर्खिया, खलील अहमद

पंजाबचा संघ- जॉनी बेअरस्टो, शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियम लिव्हिंगस्टोन, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग

Web Title: Axar Patel clean Bowled Punjab Captain Mayank Agarwal completes 100 wickets in IPL Career IPL 2022 PBKS vs DC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.