फुलंब्री निवडणूक निकाल: बागडेनानांनी गड राखला; कॉंग्रेसच्या कल्याण काळेंचा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 06:22 PM2019-10-24T18:22:36+5:302019-10-24T18:23:58+5:30
Phulanbri Vidhan Sabha Election Results 2019: Haribhau Bagade vs Kalyan Kale बागडे-काळे यांच्यात थेट लढत झाली
फुलंब्री विधानसभा मतदारसंघात याहीवेळी भाजपचे हरिभाऊ बागडे व काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांच्यात थेट लढत झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत भाजपचे हरिभाऊ बागडे यांनी जवळपास १५५०० मतांनी विजय मिळवला आहे. हरिभाऊ बागडे यांना १०६०८७ मते तर डॉ. काळे यांना ९०९०५ मते मिळाली.
मागील निवडणुकीतही या दोघांमध्ये थेट लढत झाली होती. २००४ ते २०१४ पर्यंत काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे आमदार होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघामध्ये कामासंबंधीची कोणतीही कसर ठेवली नव्हती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे त्यांचा थोड्या मतांनी पराभव झाला. तरीही पराभवाला न जुमानता मतदारसंघात त्यांचा कार्यकर्ते, सामान्य मतदार, शेतकऱ्यांसोबत संपर्क कायम ठेवत हरिभाऊ बागडे यांच्या समोर तगडे आव्हान उभे केले होते. मात्र पाच वर्षात केलेल्या विकास कामांमुळे काही गावांमधील एकगठ्ठामते बागडे यांनी मिळाली. तसेच औरंगाबाद शहरातील महानगर पालिकेची १२ प्रभाग या मतदारसंघात येतात, यात भाजपला मानणारा मतदार बागडे यांच्या मागे उभा राहिल्याने त्यांना विजय सुकर गेल्याची चर्चा आहे.
असे होते २०१४ चे चित्र :
- हरिभाऊ बागडे (भाजप-विजयी)
- कल्याण काळे (काँग्रेस-पराभूत)