आता सकाळी मोकळ्या हवेत फिरा बिनधास्त; जाणून घ्या छत्रपती संभाजीनगर एअर क्वालिटी

By साहेबराव हिवराळे | Published: February 15, 2024 01:44 PM2024-02-15T13:44:27+5:302024-02-15T13:44:39+5:30

कारखान्यातून निघणारा धूर आता कमी झाला आहे. औद्योगिक क्षेत्रात बॉयलर कमी झाले आहेत.

Now in the morning walk untroubled in the open air; Know Chhatrapati Sambhajinagar Air Quality | आता सकाळी मोकळ्या हवेत फिरा बिनधास्त; जाणून घ्या छत्रपती संभाजीनगर एअर क्वालिटी

आता सकाळी मोकळ्या हवेत फिरा बिनधास्त; जाणून घ्या छत्रपती संभाजीनगर एअर क्वालिटी

छत्रपती संभाजीनगर : आपल्या शहरातील हवेची गुणवत्ता कशी आहे? या गुणवत्तेचा आणि आजाराचा काय संबंध? असा विचार केल्यास औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण पसरविणाऱ्या कारखान्यानेच आता गुणवत्तेची कास पकडलेली असून प्रदूषणाचा आलेख-इंडेक्स स्तर पार ६० वर येऊन ठेपला आहे. त्यामुळे प्रदूषणामुळे आजारी पडणाऱ्यांची संख्याही आता रोडावली आहे. सकाळच्या मोकळ्या हवेचा फायदा घेत मॉर्निंग वॉक करण्यास काहीच हरकत नाही.

धूर झाला कमी 
शहरात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने वाळूज व शहरासह ५ ठिकाणी शहराची एअर क्वालिटी आता ६०वर जाऊन पोहोचली आहे. कारखान्यातून निघणारा धूर आता कमी झाला आहे. औद्योगिक क्षेत्रात बॉयलर कमी झाले आहेत.

इंडेक्स १०० पेक्षा कमी
इंडेक्स १०० पेक्षा कमी असल्याने तसेच तो ६०पर्यंत जाऊन पोहोचला असल्याने प्रदूषणमुक्तीच्या दिशेनेे वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे आजाराचे प्रमाण एकदम घटले आहे.

का वाढला एअर क्वालिटी इंडेक्स? 
धूळ : शहरात बांधकाम केलेल्या रस्त्याची सफाई रोज होत आहे.

वायू प्रदूषण : आरटीओ व पोलिस प्रशासनाच्या कारवाईमुळे प्रदूषण पसरविणाऱ्या मोटारसायकल चालकांवर कारवाई होत आहे. त्याचाही सकारात्मक परिणाम होत आहे.

कर्णकर्कश हॉर्न : काही दिवसांपासून वाहनांचे हॉर्न जोराने वाजविले जात होते. पण त्यांच्यावरही कारवाया होत असल्याने ध्वनीप्रदूषण कमी झाले आहे.

अधिक उत्तम वातावरणास झाडे लावा..
मानवाला उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी शुद्ध हवेची नितांत गरज आहे. वातावरणातील बदलासाठी प्रत्येकाने झाडे लावावीत, असा संकल्प करणे गरजेचे आहे. - प्रकाश जाधव, पर्यावरण प्रेमी

झाड लावून वाढदिवस साजरा करा
आता प्रत्येकाने केक कापण्यापेक्षा झाड लावून ते जपण्याचा प्रयत्न करावा. - मनोज गायकवाड 

प्रदूषणमुक्त जगा..
शहरातील आवडी निवडी वाढत असून, स्वत:चे आरोग्य उत्तमरित्या जगण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. पर्यावरण उत्तम राहावे व कायम टिकून राहावे यासाठी हिरवळ निर्माण करणे गरजेचे आहे. : डॉ. एस. पी. मोहिते

शहराचे आरोग्य जपले
शहरात एअर क्वालिटी इंडेक्स जपलेला असून, पाच ठिकाणी जनतेला शहराचा इंडेक्स पाहता येतो.- प्रकाश मुंढे, उपप्रादेशिक अधिकारी

Web Title: Now in the morning walk untroubled in the open air; Know Chhatrapati Sambhajinagar Air Quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.