औरंगाबादमध्ये ‘काँटे की टक्कर’; ७०० मतदान केंद्रांवर वाढलेले मतदान ठरणार गेमचेंजर

By विकास राऊत | Published: May 18, 2024 01:12 PM2024-05-18T13:12:20+5:302024-05-18T13:16:03+5:30

सहा मतदारसंघांत ७०० मतदान केंद्रांवर वाढलेले मतदान गेमचेंजर ठरणार असून बहुतांश बूथवर ८० टक्क्यांच्या पुढे मतदान

'Kante Ki Takkar' in Aurangabad; Increased polling at 700 polling stations will be a game changer | औरंगाबादमध्ये ‘काँटे की टक्कर’; ७०० मतदान केंद्रांवर वाढलेले मतदान ठरणार गेमचेंजर

औरंगाबादमध्ये ‘काँटे की टक्कर’; ७०० मतदान केंद्रांवर वाढलेले मतदान ठरणार गेमचेंजर

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान झाले. मतदान केंद्रांवरील आकडे शिवसेना, एमआयएम आणि ठाकरेसेनेत ‘काँटे की टक्कर’ होईल, असे सांगत आहेत. सहा मतदारसंघांत ७०० मतदान केंद्रांवर वाढलेले मतदान गेमचेंजर ठरणार असून बहुतांश बूथवर ८० टक्क्यांच्या पुढे मतदान झाल्याचे प्राथमिकरीत्या दिसते. शहरी भागातील पूर्व, मध्य आणि पश्चिम मतदारसंघातील मुस्लिमबहुल भागातील मतदान केंद्रांवर ८० ते ९० टक्क्यांच्या आसपास झालेले मतदान एमआयएमच्या आशा पल्लवीत करीत आहेत. तर त्या तुलनेत हिंदूबहुल भागातील केंद्रांवरही ८० टक्क्यांच्या पुढे मतदान झालेल्या केंद्रांचा आकडा मोठा असल्यामुळे महायुतीने विजयाचे गणित मांडत आहे. हिंदू वसाहतींमध्ये वाढलेल्या मतदानामुळे ठाकरे गटाला मोठी अपेक्षा आहे. तर वंचित बहुजन आघाडीसह अपक्षांच्या पारड्यात किती मते गेली, याची आकडेमोड राजकीय पक्ष करीत आहेत.

शहर व ग्रामीण मतदानाची तुलना

शहरात झालेले मतदान : ६ लाख ५३ हजार ९१७
ग्रामीणमध्ये झालेले मतदान : ६ लाख ४५ हजार १२३
शहरात ग्रामीणपेक्षा ८ हजार ७९४ मतदान जास्त
एकूण मतदान : १२ लाख ९९ हजार ४०

७० टक्क्यांहून अधिक मतदान किती केंद्रांवर?
कन्नड : ३५९..............७०
औरंगाबाद मध्य : ३१६.....६०
औरंगाबाद पश्चिम : ३७४.......६०
औरंगाबाद पूर्व : ३०५......७०
गंगापूर : ३४८..........६०
वैजापूर : ३३८........५५
एकूण : ३७५

मुस्लिम पट्ट्यांतील बूथवर ८० टक्क्यांच्या पुढे मतदान
शहरातील तिन्ही मतदारसंघांत मुस्लिम मतदान असलेल्या मतदान केंद्रांची संख्या ३०० च्या आसपास आहे. त्यावर ८० टक्क्यांच्या पुढे मतदान झालेल्या केेंद्रांची संख्या ७० टक्क्यांच्या आसपास आहे. तर उर्वरित बूथवर ६० ते ७० टक्के मतदान झाले आहे.

हिंदूबहुल भागातही दणकावून मतदान
शहरातील ९९५ पैकी सुमारे ६९५ मतदान केंद्र हिंदू आणि दलित व इतर मतदारांचे प्राबल्य असलेले आहेत. त्यातील हिंदूबहुल प्राबल्य असलेल्या ८० टक्के बूथवर दणकावून मतदान झाले आहे. या वाढलेल्या मतदानावर महायुती आणि महाविकास आघाडीसह एमआयएमदेखील दावा करीत आहे.

ग्रामीण भागात किती बूथ ८० टक्क्यांच्या पुढे?
ग्रामीण भागात १०२५ मतदान केंद्र आहेत. त्यातील ४०० बूथवर ८० टक्क्यांपेक्षा जास्तीचे मतदान झाल्याचा अंदाज आहे. त्यात गंगापूर, वैजापूर, कन्नडमधील मतदान केंद्रांचा समावेश आहे. यात गंगापूर ६०, वैजापूर ५० तर कन्नडमध्ये ६० बूथवर मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे.

कुणाचे गणित काय?
ग्रामीण भागात झालेल्या मतदानाच्या तुलनेत शहरातील तिन्ही मतदारसंघात ८ हजार ७९४ मतदान जास्त झाले. एमआयएमची भिस्त शहरातील मतदान केंद्रांवर अधिक आहे. ग्रामीण भागात मुस्लिम मतदान आणि काही प्रमाणात दलित व हिंदू मतदानांमुळे विजय होण्याची अपेक्षा एमआयएमला आहे. महायुती २०४० मतदान केंद्रांपैकी सुमारे १७०० मतदान केंद्रांवर कमी-अधिक मतदान मिळाल्याचा दावा करीत आहे. तर ठाकरे गट २०४० बूथवर कमी-अधिक मतदान मिळाल्याचा दावा करीत विजयाचे गणित मांडत आहे.

Web Title: 'Kante Ki Takkar' in Aurangabad; Increased polling at 700 polling stations will be a game changer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.