अपघातातील जखमीचा उपचारासाठी नेत असताना दुसऱ्या अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2022 11:22 AM2022-08-26T11:22:18+5:302022-08-26T11:26:00+5:30

एक ठार, चार जखमी; नागभीड तालुक्यातील बोकोडोह येथील विचित्र घटना

The injured in the accident died in the second accident while being taken for treatment | अपघातातील जखमीचा उपचारासाठी नेत असताना दुसऱ्या अपघातात मृत्यू

अपघातातील जखमीचा उपचारासाठी नेत असताना दुसऱ्या अपघातात मृत्यू

googlenewsNext

तळोधी बा.(चंद्रपूर) : नागभीड तालुक्यातील बोकोडोह येथे झालेल्या विचित्र अपघातात एक जण ठार झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडला. या अपघातात सुधाकर वासुदेव सयाम (५०) असे मृतकाचे नाव आहे.

सुधाकर व अंकुश राम बारसागडे (३०) रा. सावर्ला हे दोघे दुचाकीने जात असताना त्यांच्या वाहनाला सुमोने धडक दिली. यात सुधाकर व अंकुश गंभीर जखमी झाले. दोघेही कसेबसे दुचाकीने उपचार करण्यासाठी जात असताना दुसऱ्या एका दुचाकीशी धडक झाली. यामध्ये आधीच गंभीर जखमी झालेल्या सुधाकरचा जागीच मृत्यू झाला, तर अंकुश केवळराम बारसागडे, प्रकाश मनीराम नैताम (५२) रा. चंद्रपूर, ज्ञानेश्वर श्रीराम मडावी (४६) रा. मांगली अरब व काशीनाथ रामदास पुराम (६३) रा. आकापूर हे जखमी झाले. त्यांच्यावर तळोधी (बा.) येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू होते.

सेल्फीच्या नादात दोन युवकांचा धरणात बुडून मृत्यू; मित्राला वाचविताना गमावला जीव

प्राप्त माहितीनुसार, नागभीड तालुक्यातील सावर्ला येथील अंकुश बारसागडे हा कावीळ औषध घेण्यासाठी तळोधी बा.ला येत असताना विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या सुमोने बोकोडोह नाल्याजवळील कबाडी दुकानाजवळ दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये सुधाकर सयाम व अंकुश बारसागडे हे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेतच अंकुश हा सुधाकरला दुचाकीने उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना पुन्हा विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका दुचाकीशी पुन्हा धडक झाली. यामध्ये दोन्ही दुचाकींवरील चार जण गंभीर जखमी झाले. यातील आधीच गंभीर जखमी असलेला सुधाकर सयाम याचा जागीच मृत्यू झाला. अन्य जखमींना डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारासाठी ब्रह्मपुरी किंवा चंद्रपूर नेण्यासाठी तयारी सुरु होती. तळोधी बा. पोलीस स्टेशन ठाणेदार शेंडे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या अपघातातील अज्ञात असलेला सुमोचालक वाहन घेऊन पसार झाला. तळोधी पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: The injured in the accident died in the second accident while being taken for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.