दक्षिणचा दिलासा, मध्य रेल्वेला अजूनही जाग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 05:00 AM2022-05-23T05:00:00+5:302022-05-23T05:00:37+5:30

बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेसमुळे चंद्रपूर-यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्रवाशांसह रुग्णांना उपचारासाठी मुंबईत जाणे सोयीचे होते. कोरोना संकट आले आणि सेवाग्राम कायमची बंद झाली. सध्या स्थितीत मुंबईला जाण्यासाठी वर्धा, नागपूर येथून ट्रेन पकडावी लागते. त्यामुळे आर्थिक ताणासह वेळेचाही अपव्यय होत आहे. दादरपर्यंत पोहचण्यासाठी किमान १८ ते २० तास लागणार आहे.

The consolation of the South, the Central Railway is still not awake | दक्षिणचा दिलासा, मध्य रेल्वेला अजूनही जाग नाही

दक्षिणचा दिलासा, मध्य रेल्वेला अजूनही जाग नाही

googlenewsNext

साईनाथ कुचनकार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बल्लारशा-मुंबई सेवाग्राम ही जिल्ह्यातील प्रवाशांसाठी हक्काची असलेली एक्स्प्रेस कोरोना संकट काळात बंद करण्यात आली. ती अजूनही बंदच आहे. ही ट्रेन सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेकडे प्रवासी संघटनांनी अनेकवेळा साकडे घातले. मात्र मध्य रेल्वेने अजूनही ती सुरू केली नाही. दरम्यान, दक्षिण मध्य रेल्वेने प्रवासांना दिलासा देत मुंबईसाठी समर ट्रेन सुरू केली आहे. मात्र तिला दादरपर्यंत पोहचण्यासाठी किमान १८ ते २० तास लागणार आहे. एवढेच नाही तर २८ मे ते २५ जूनपर्यंत केवळ पाच दिवसच ती चालणार आहे.
बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेसमुळे चंद्रपूर-यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्रवाशांसह रुग्णांना उपचारासाठी मुंबईत जाणे सोयीचे होते. कोरोना संकट आले आणि सेवाग्राम कायमची बंद झाली. सध्या स्थितीत मुंबईला जाण्यासाठी वर्धा, नागपूर येथून ट्रेन पकडावी लागते. त्यामुळे आर्थिक ताणासह वेळेचाही अपव्यय होत आहे. त्यामुळे बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम ही एक्स्प्रेस पूर्ववत सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, रेल्वे प्रवासी संघटनांनी अनेकवेळा मध्य रेल्वेकडे पाठपुरावा केला. दरम्यान, मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांनी नुकतीच बल्लारशाह, चंद्रपूर येथील रेल्वे स्टेशनची पाहणीही केली आहे. विशेष म्हणजे, त्या पूर्वी बल्लारशा येथून मुंबईसाठी ट्रेन सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेने हालचाली केल्या. एवढेच नाही तर या ट्रेनचा टाईमटेबलही तयार करण्यात येऊन ट्रेन सोडण्याचा दिवसही ठरला. मात्र ट्रेन कुठे गेली,याचा कुणालाच पत्ता लागला नाही. आता दक्षिण मध्य रेल्वेने समर ट्रेन सुरू केली. एका महिन्यामध्ये केवळ पाचवेळा ती चालणार आहे. त्यातच ती आदिलाबाद, नांदेड, औरंगाबाद मार्गे जाणार असल्याचे बराच वेळसुद्धा लागणार आहे.

आता आंदोलन हाच पर्पयाय

नुकतीच मध्य रेल्वेचे महाप्रबंधकांनी बल्लारशा, चंद्रपूर येथे येऊन पाहणी केली. यावेळी जिल्ह्यातील विविध रेल्वे संघटना, सामाजिक संस्थांनी निवेदन देत बल्लारशाह-मुंबई ही नियमित ट्रेन सुरू करण्याची मागणी लावून धरली. मात्र, अजूनपर्यंत कोणताही प्रतिसाद दिला नाही. आता ट्रेनसाठी आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही.
-श्रीनिवास सुंचूवार, झेडआरयुसीसी सदस्य, मध्य रेल्वे

दक्षिणाला जमलं ते मध्य रेल्वे का नाही 
दक्षिण मध्य रेल्वेने  कसाबसा प्रयत्न करून किमान  समर ट्रेन सुरू केली आहे. मात्र मध्य रेल्वेला बल्लारशाह स्टेशनवरून अधिक उत्पन्न असतानाही येथून थेट मुंबईसाठी ट्रेन सुरूच करता आली नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: The consolation of the South, the Central Railway is still not awake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे