शिवसेना आणि संभाजी बिग्रेडच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची ओळख परेड; पुढील निवडणुकींची तयारी
By साईनाथ कुचनकार | Published: September 2, 2022 06:41 PM2022-09-02T18:41:40+5:302022-09-02T18:46:29+5:30
चंद्रपुरात शिवसेना आणि संभाजी बिग्रेडची संयुक्त बैठक येथील विश्रामगृहात पार पडली.
चंद्रपूर : मागील काही दिवसामध्ये राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर विविध राजकीय समिकरणेही बदलली. दरम्यान, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती झाल्यानंतर जिल्हास्तरावरही आता बैठकांचे सत्र पार पडत असून ओळख परेड घेतली जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदे गटाचा प्रभाव नाही. मात्र नव्या युतीनंतर चंद्रपुरात शिवसेना आणि संभाजी बिग्रेडची संयुक्त बैठक येथील विश्रामगृहात पार पडली. या बैठकीमध्ये वरिष्ठांच्या निर्णयानुसार पुढील निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
बैठकीला संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक प्रा. प्रेमकुमार बोके, प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत वैद्य, राज्यनेते डॉ. दिलीप चौधरी, विभागीय अध्यक्ष विनोद थेरे, विभागीय कार्याध्यक्ष रवी आसूटकर, विभागीय सचिव चेतन पावडे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सचिन बोधाने, महानगरअध्यक्ष ॲड. मनीष काळे, दीपक खारकर, बाळा बोढे, चंद्रशेखर झाडे, प्रमोद वाभिटकर, प्रकाश पिंपळकर, दीनेश उरकुडे, अमोल वैद्य, मंगेश चटकी आदी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, महानगरप्रमुख सुरेश पचारे, युवासेना समन्वयक विनय धोबे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीमध्ये वरिष्ठ नेत्यांनी ठरविलेल्या निर्णयानुसार स्थानिक निवडणुकांसंदर्भात चर्चा करण्यात आली.
वरिष्ठ स्तरावर शिवसेना आणि संभाजी बिग्रेडची युती झाल्यानंतर चंद्रपूरमध्ये प्रथमच बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पुढील रणणीतीबाबत चर्चा करण्यात आली. या युतीमुळे पक्षाची आणखी ताकत वाढली आहे.
- संदीप गिऱ्हे, जिल्हाप्रमुख, शिवसेना