चंद्रपूरची निशिता देणार नासा स्पेस संस्थेला भेट; ४० हजार विद्यार्थ्यांमधून झाली निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 05:24 PM2023-02-02T17:24:16+5:302023-02-02T17:35:21+5:30

कारमेल अकॅडमीच्या निशिताला ‘लायफोलाॅजी डायमंड एससीइ अवाॅर्ड’

Chandrapur's Nishita 0f class 10 gets chance to visit NASA under Lifeology Global Fellowship | चंद्रपूरची निशिता देणार नासा स्पेस संस्थेला भेट; ४० हजार विद्यार्थ्यांमधून झाली निवड

चंद्रपूरची निशिता देणार नासा स्पेस संस्थेला भेट; ४० हजार विद्यार्थ्यांमधून झाली निवड

Next

चंद्रपूर : लायफोलाॅजी ग्लोबल फेलोशिप सत्र-२ या स्पर्धेमध्ये येथील कारमेल अकॅडमी सी. आय. एस. सी. इ. ची वर्ग १० वीतील निशिता प्रशांत खाडीलकर या विद्यार्थिनीने ‘लायफोलाॅजी डायमंड एससीइ अवाॅर्ड’चा बहुमान पटकावला आहे. तिला आता नासा स्पेस संस्थेला मोफत भेट देण्याची संधी मिळाली आहे.

लायफोलाॅजी वैश्विक फेलोशिप स्पर्धा ही ऑनलाईन घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये विविध देशातील चाळीस हजार स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये विविध निवड चाचण्यांच्या माध्यमातून पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली. यामध्ये ‘लायफोलाॅजी डायमंड एससीइ अवाॅर्ड’चा बहुमान कारमेलमधील निशिताला मिळाला आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेचे व्यवस्थापक फादर सब्यास्तीयन व्हायलील, मुख्याध्यापिका कविता नायर तसेच शिक्षकांनी कौतुक केले आहे.

Web Title: Chandrapur's Nishita 0f class 10 gets chance to visit NASA under Lifeology Global Fellowship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.