lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

Azim Premji Wipro Nokia Deal : अझीम प्रेमजी यांची कंपनी विप्रो ही भारतातील सॉफ्टवेअर सेवा पुरवणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीनं आता मोठी डील केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 08:30 AM2024-05-03T08:30:26+5:302024-05-03T08:31:33+5:30

Azim Premji Wipro Nokia Deal : अझीम प्रेमजी यांची कंपनी विप्रो ही भारतातील सॉफ्टवेअर सेवा पुरवणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीनं आता मोठी डील केली आहे.

Once dominated the mobile phone sector Wipro will now upgrade nokia workplace Got a mega deal | एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

Azim Premji Wipro Nokia Deal : अझीम प्रेमजी यांची कंपनी विप्रो ही भारतातील सॉफ्टवेअर सेवा पुरवणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. ३० एप्रिलपर्यंत कंपनीचं बाजार भांडवल २,४१,००० कोटी रुपये होतं. फोर्ब्सनुसार, प्रेमजी हे जगभरातील सर्वात उदार अब्जाधीशांपैकी एक मानले जातात. त्यांची रिअल टाइम नेटवर्थ ९७,६५० कोटी रुपये आहे. नुकतीच विप्रोनं अझीम प्रेमजी यांची कंपनीच्या नॉन एक्झिक्युटिव्ह, नॉन इंडिपेंडेंट डायरेक्टरपदी पुन्हा नियुक्ती केली आहे.
 

त्यानंतर लगेचच आयटी कंपनीनं नोकियाच्या डिजिटल वर्कप्लेस सर्व्हिसेस अपग्रेड करण्यासाठी कोट्यवधी डॉलर्सचा करार केला. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार विप्रोची टीम नोकियाच्या कर्मचाऱ्यांसाठी कस्टमाईज्ड एआय-पॉवर्ड, क्लाउड-आधारित प्रणाली विकसित करेल. १३० देशांमध्ये या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ८६,७०० इतकी आहे. मॉड्युलर, सुरक्षित आणि ऑटोमॅटिक सेवांच्या डिलिव्हरीद्वारे कर्मचाऱ्यांचा अनुभव सुधारणं हे यामागील उद्दिष्ट आहे. एकेकाळी नोकियानं भारतीय मोबाइल फोन मार्केटवर राज्य केलं होतं.
 

युजर सर्चवर लवकरच काम सुरू होणार
 

विप्रो डिझाइनिट कर्मचाऱ्यांना योग्य वेळी वैयक्तिक सहाय्य प्रदान केलं जाईल याची खात्री करण्यासाठी युझर रिसर्च करेल. ही विप्रो अंतर्गत एक कंपनी आहे जी युझर एक्सपिरिअन्स स्ट्रॅटजी आणि अंमलबजावणीमध्ये माहिर आहे.
 

ग्लोबल सर्व्हिस डेस्क तयार करण्यात येणार
 

या प्रकल्पामुळे एक ग्लोबल सर्व्हिस डेस्क स्थापन होईल जो एक्सपिरिअन्स ड्रिव्हन, ओमनी चॅनल आणि कायमच उपलब्ध असेल. हे डेस्क कर्मचाऱ्यांना हायब्रीड कामाच्या वातावरणात प्रभावीपणे नेव्हिगेट करण्यात मदत करण्यासाठी लवचिक आणि सुरक्षित सेवाही प्रदान करेल.
 

विप्रो ही एक भारतीय बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान, सल्लागार आणि व्यावसायिक सेवा कंपनी आहे. याचे मुख्यालय बेंगळुरू येथे आहे. ही भारतातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. ही जगातील १०० सर्वात मोठ्या आयटी सेवा कंपन्यांपैकी एक आहे.

Web Title: Once dominated the mobile phone sector Wipro will now upgrade nokia workplace Got a mega deal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.