lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Flipkart वर 'या' क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास सतत मिळेल 5 टक्के कॅशबॅक! 

Flipkart वर 'या' क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास सतत मिळेल 5 टक्के कॅशबॅक! 

Flipkart : फ्लिपकार्टवरून (Flipkart) नियमित खरेदी करत असाल, तर फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड (Flipkart Axis Bank Credit Card)  तुमच्यासाठी एक शानदार कार्ड ठरू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 03:55 PM2023-02-04T15:55:26+5:302023-02-04T15:55:49+5:30

Flipkart : फ्लिपकार्टवरून (Flipkart) नियमित खरेदी करत असाल, तर फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड (Flipkart Axis Bank Credit Card)  तुमच्यासाठी एक शानदार कार्ड ठरू शकते.

flipkart axis bank credit card fees and charges apply now get 5 pc unlimited cashback on flipkart shopping | Flipkart वर 'या' क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास सतत मिळेल 5 टक्के कॅशबॅक! 

Flipkart वर 'या' क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास सतत मिळेल 5 टक्के कॅशबॅक! 

नवी दिल्ली : देशात क्रेडिट कार्डचे (Credit Card) चलन वाढत आहे. शॉपिंगच्यावेळी क्रेडिट कार्डद्वारे काही रिवॉर्ड्स आणि कॅशबॅक ऑफर देखील घेऊ शकता. जर तुम्ही आघाडीची ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवरून (Flipkart) नियमित खरेदी करत असाल, तर फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड (Flipkart Axis Bank Credit Card)  तुमच्यासाठी एक शानदार कार्ड ठरू शकते.

फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड हे को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड आहे. यामध्ये फ्लिपकार्ट शॉपिंगवर अतिरिक्त फायदा मिळतो. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डची सर्वात मोठी खासियत म्हणजे कॅशबॅकवर कोणत्याही प्रकारची कॅपिंग नाही. याचा अर्थ तुम्ही एका बिलिंग सायकलमध्ये अनलिमिटेड कॅशबॅक मिळवू शकता. मिळालेली कॅशबॅक तुमच्या क्रेडिट कार्ड अकाउंटमध्ये जमा होते.

कार्डचे खास फीचर्स...
>> फ्लिपकार्ट आणि मिंत्रावर या कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळते.
>> या कार्डद्वारे Cleartrip, PVR, Uber, Swiggy, Cure.Fit आणि Tata Sky वर खर्च केल्यास 4 टक्के कॅशबॅक मिळत आहे.
>> इतर ऑनलाइन किंवा ऑफलाइन पेमेंट करण्यासाठी 1.5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळत आहे.
>> कोणत्याही ई-वॉलेट लोड, फ्यूल खर्च इत्यादींवर कोणताही कॅशबॅक उपलब्ध नाही.
>> कार्डधारकाला वर्षभरात 4 एअरपोर्ट लाउंजमध्ये मोफत अॅक्सेस मिळतो.
>> या कार्डद्वारे पेट्रोल पंपांवर 400 ते 4 हजार रुपयांच्या फ्यूल खरेदीवर 1 टक्के फ्यूल सरचार्ज भरावा लागणार नाही. एका बिलिंग सायकलमध्ये कमाल 500 रुपयांचा फ्यूल सरचार्ज माफ केला जाऊ शकतो.
>> हे कार्ड कॉन्टॅक्टलेस टॅक्नॉलॉजीने सुसज्ज आहे, जे ग्राहकांना 'टॅप आणि पे' ची सुविधा देखील देते. म्हणजेच कार्ड स्वाइप न करता फक्त पीओएस मशीनवर टॅप करून पेमेंट करता येते.

कार्डची फी
>> या कार्डची जॉईनिंग फी 500 रुपये आहे.
>> या कार्डची वार्षिक फी 500 रुपये आहे. मात्र, वर्षभरात दोन लाख रुपये खर्च केल्यानंतर एॅन्युएल फी रिव्हर्स केली जाते.

Web Title: flipkart axis bank credit card fees and charges apply now get 5 pc unlimited cashback on flipkart shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.