Lokmat Money > बिझनेस न्यूज > RBIनंतर आता SEBI ॲक्शनमध्ये! हिंडनबर्ग-अदानी प्रकरणानंतर म्हणाले, “बाजाराशी खेळ चालणार नाही…”

RBIनंतर आता SEBI ॲक्शनमध्ये! हिंडनबर्ग-अदानी प्रकरणानंतर म्हणाले, “बाजाराशी खेळ चालणार नाही…”

हिंडनबर्गच्या नुकत्याच आलेल्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 09:16 PM2023-02-04T21:16:29+5:302023-02-04T21:17:10+5:30

हिंडनबर्गच्या नुकत्याच आलेल्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

After RBI now SEBI in action On the Hindenburg Adani case report committed ensuring integrity market adani shares falling | RBIनंतर आता SEBI ॲक्शनमध्ये! हिंडनबर्ग-अदानी प्रकरणानंतर म्हणाले, “बाजाराशी खेळ चालणार नाही…”

RBIनंतर आता SEBI ॲक्शनमध्ये! हिंडनबर्ग-अदानी प्रकरणानंतर म्हणाले, “बाजाराशी खेळ चालणार नाही…”

हिंडनबर्गच्या नुकत्याच आलेल्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. यासंदर्भात सेबीने मोठे वक्तव्य केले आहे. गेल्या आठवड्यात एका व्यावसायिक समूहाच्या शेअर्समध्ये असामान्य रित्या चढ-उतार दिसून आल्याचे सेबीकडून सांगण्यात आले आहे. बाजाराची अखंडता सुनिश्चित करण्यासाठी सेबी वचनबद्ध आहे. बाजाराच्या संरचनात्मक मजबुतीसाठीही आपण वचनबद्ध असल्याचे सेबीने म्हटले आहे. तसेच शेअर बाजार पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने चालावा, अशी आमची इच्छा आहे, असेही सेबीकडून स्पष्ट करण्यात आलेय.

4 फेब्रुवारी रोजी प्रसिद्धीपत्रकात, SEBI ने म्हटले आहे की ते बाजाराचे सुव्यवस्थित आणि कार्यक्षम कामकाज राखण्याचा प्रयत्न करत आहे आणि विशिष्ट शेअर्समध्ये अधिक अस्थिरता दूर करण्यासाठी सार्वजनिक देखरेखीची एक प्रणाली देखील आहे. जेव्हा कोणत्याही स्टॉकच्या किमतींमध्ये प्रचंड चढ-उतार होते, तेव्हा काही विशिष्ट परिस्थितींसह मॉनिटरिंग सिस्टम आपोआप सुरू होते, असेही सेबीने नमूद केलेय. कर्जदारांच्या चिंता दूर करत देशाची बँकिंग व्यवस्था लवचिक आणि स्थिर असल्याचे रिझर्व्ह बँकेने यापूर्वी म्हटले होते. रिझर्व्ह बँकेच्या या वक्तव्यानंतर सेबीकडून यावर भाष्य करण्यात आलेय.

मार्केट कॅप कमी झाले
अमेरिकन इन्व्हेस्टमेंट फर्म आणि शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने 24 जानेवारी 2023 रोजी एक रिपोर्ट समोर आणला. हा अहवाल अदानी समूहाबाबत होता. अहवालात अदानी समूहावर शेअर्समध्ये फेरफार आणि अकाउंटिंग फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहहे. हा अहवाल आल्यापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. अहवाल येण्यापूर्वी, अदानी समूहाच्या शेअर्सचे मार्केट कॅप 16 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होते, जे शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 रोजी 10 लाख कोटी रुपयांच्या खाली आले.

Web Title: After RBI now SEBI in action On the Hindenburg Adani case report committed ensuring integrity market adani shares falling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.