दहा हजारांची लाच घेताना वनपाल जाळ्यात; आरोप सिद्ध न होण्यासाठी घेतली लाच

By सदानंद सिरसाट | Published: May 7, 2024 02:08 PM2024-05-07T14:08:44+5:302024-05-07T14:09:54+5:30

वन गुन्हा दाखल असलेला व्यक्ती आरोपी म्हणून सिद्ध न व्हावा, यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव जामोद येथील वनपालाने दहा हजारांची लाच स्वीकारल्याची घटना घडली आहे.

while taking a bribe of ten thousand the bribe was taken in order not to prove the charges in the forester network | दहा हजारांची लाच घेताना वनपाल जाळ्यात; आरोप सिद्ध न होण्यासाठी घेतली लाच

दहा हजारांची लाच घेताना वनपाल जाळ्यात; आरोप सिद्ध न होण्यासाठी घेतली लाच

सदानंद सिरसाट, जळगाव (जामोद) : वन गुन्हा दाखल असलेला व्यक्ती आरोपी म्हणून सिद्ध न व्हावा, यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव जामोद येथील वनपालाने दहा हजारांची लाच स्वीकारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ६ मे रोजी सापळा रचून वनपाल शेख कलीम शेख बिबन (वय ४८) याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्याच्यावर जळगाव जामोद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, जळगाव जामोद येथे वनविभागाच्या अखत्यारितील सालई गोंद अवैधरीत्या जमा केल्याने एका जणावर गुन्हा दाखल होता. त्या व्यक्तीविरुद्ध आरोप सिद्ध न व्हावा, यासाठी वनपाल शेख कलीम शेख बिबन याने दहा हजारांची मागणी केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती मिळाली. 

त्यांनतर ६ मे रोजी जळगाव जामोद येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात सापळा रचण्यात आला. त्यावेळी वनपाल शेख कलीम याला दहा हजारांची लाच स्वीकारताना पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बुलढाणा येथील पोलिस उपअधीक्षक शीतल घोगरे, निरीक्षक सचिन इंगळे, सहायक फौजदार श्याम भांगे, हवालदार प्रवीण बैरागी, हवालदार विनोद लोखंडे, जगदीश पवार, रणजित व्यवहारे, चालक हवालदार नितीन शेटे, हर्षद शेख यांनी पार पाडली.

Web Title: while taking a bribe of ten thousand the bribe was taken in order not to prove the charges in the forester network

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.