पळशी सुपो येथील शेतातील झाडाला गळफास घेऊन एकाची आत्महत्या

By विवेक चांदुरकर | Published: May 2, 2024 09:33 AM2024-05-02T09:33:44+5:302024-05-02T09:33:56+5:30

मृतदेह सरकारी दवाखान्यात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला, भारतच्या मृत्यू मुळे पळशी सुपो परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

A man committed suicide by hanging himself from a tree in the farm in Palashi Supo buldhana | पळशी सुपो येथील शेतातील झाडाला गळफास घेऊन एकाची आत्महत्या

पळशी सुपो येथील शेतातील झाडाला गळफास घेऊन एकाची आत्महत्या

पळशी सुपो :- येथील ३७ वर्षीय इसमाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना एक मे रोजी रात्री उशिरा उघडकीस आली

पळशी सुपो ता. जळगांव जामोद येथील भारत शामराव कोकाटे वय ३७ वर्ष हे दि.३० एप्रिल रोजी संध्याकाळी मोटार सायकल घेवून घरून निघून गेले. बराच वेळानंतर घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. मात्र कुठेच न आढळल्यामुळे याबाबत जळगांव जा.पो.स्टे ला माहिती देण्यात आली.१ मे रोजी रात्री ८ वाजे दरम्यान पळशी सुपो शिवारात फतेपुर रोड नजिक चे शेतात भारत कोकाटे यांनी झाडाला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यावरून जळगांव जा. पो स्टे मद्ये आकस्मिक मृत्यूची नोंद  करण्यात आली.

मृतदेह सरकारी दवाखान्यात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला, भारतच्या मृत्यू मुळे पळशी सुपो परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याचे पश्चात पत्नी, दोन मुली आई वडील,भाऊ असा आप्त परिवार आहे. त्यांच्या आत्महत्या मागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत

Web Title: A man committed suicide by hanging himself from a tree in the farm in Palashi Supo buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.