Russia-Ukrain War Live: रशियाचा युक्रेनवर मिसाईलनं हल्ला, अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 10:43 AM2022-02-24T10:43:51+5:302022-02-24T10:52:00+5:30

Russia-Ukrain War Live Updates : लष्करी कारवाईची घोषणा करत पुतिन यांनी या प्रकरणात कोणीही हस्तक्षेप करू नये, अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकीही दिली.

Russia-Ukrain War Live Updates: missile strikes in Kyiv, Kharkiv, Vladimir Putin ordered troops into eastern Ukraine | Russia-Ukrain War Live: रशियाचा युक्रेनवर मिसाईलनं हल्ला, अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज

Russia-Ukrain War Live: रशियाचा युक्रेनवर मिसाईलनं हल्ला, अनेक शहरांमध्ये स्फोटांचे आवाज

googlenewsNext

Russia-Ukrain War Live Updates : रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव आता अधिकच चिघळला आहे. गुरुवारी रशियाने युक्रेनशी युद्ध सुरू केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. एवढेच नाही, तर युक्रेन-रशिया युद्ध आता टाळता येणार नाही, असेही पुतीन यांनी म्हटले आहे. दरम्यान, रशियाने लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर युक्रेनमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनची राजधानी कीववर क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. याचबरोबर लष्करी कारवाईची घोषणा करत पुतिन यांनी या प्रकरणात कोणीही हस्तक्षेप करू नये, अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकीही दिली.

Web Title: Russia-Ukrain War Live Updates: missile strikes in Kyiv, Kharkiv, Vladimir Putin ordered troops into eastern Ukraine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :russiaरशिया