Astrology: जन्म-मृत्युसकट अनेक गोष्टींचे गूढ कुंडलीतील राहूच्या स्थानावरून ठरते; सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 01:49 PM2024-03-29T13:49:55+5:302024-03-29T13:50:36+5:30

Astrology: राहूचे नाव घेताच वैवाहिक जीवनाशी संबंधित गोष्टी लक्षात येतात, पण त्याचा प्रभाव आपल्या संपूर्ण आयुष्यातील घडामोडींवर असतो; कसा ते पहा...!

Astrology: The mystery of many things related to birth and death is determined by the position of Rahu in the horoscope; Read in detail! | Astrology: जन्म-मृत्युसकट अनेक गोष्टींचे गूढ कुंडलीतील राहूच्या स्थानावरून ठरते; सविस्तर वाचा!

Astrology: जन्म-मृत्युसकट अनेक गोष्टींचे गूढ कुंडलीतील राहूच्या स्थानावरून ठरते; सविस्तर वाचा!

>> सौ. अस्मिता दीक्षित (ज्योतिष अभ्यासक)

राहुबद्दल अनेक गोष्टी आपल्या वाचनात येत असतात . राहू राक्षसाचे शीर असून केतू धड आहे हे आता सर्वाना माहित आहे. राहू महादशा प्रत्येक लग्नाला भारी पडते . ज्यांनी ती भोगली आहे त्यांना विचारा. राहू हा व्यक्तीला भ्रमित करतो , आभास निर्माण करतो आणि त्यात तो माहीर आहे. एखादी गोष्ट डोक्यात आली कि विचारांचे पंख फुटतात आणि वेड्यासारखी व्यक्ती ती गोष्ट मिळवण्याच्या मागे धावते , खूप मोठे काहीतरी करून दाखवण्यासाठी प्रेरित होते आणि त्यासाठी, मोठे काहीतरी मिळवण्यासाठी आकाश पातळ एक करते . पण जितके मोठे ते वाटते तितके ते असते का? तर नाही . एकदाच काय तो भ्रमाचा भोपळा फुटतो आणि राहू नेमके हेच करतो. कश्याचा तरी आभास तुमच्यासमोर निर्माण करून त्यात तुम्हाला अडकवतो  आणि त्या आभासी दुनियेत आपण हरवतो . ज्या वेळी हा आभास आहे हे लक्ष्यात येते त्यावेळी वेळ निघून गेलेली असते आणि आपला होतो तो “ भ्रमनिरास “ . राहुकडे मुख आहे त्यामुळे त्याला सगळ्याची हाव आहे पण शरीर नसल्यामुळे त्या पचवण्याची ताकद नाही . मी हे करीन आणि ते करीन पण करणार कसे ? 

एखाद्या व्यक्तीत किंवा गोष्टीत जितक्या लवकर अडकतो किंवा त्याचा विचार करतो , किंवा खूप जवळ जातो तितक्याच वेगाने दूर सुद्धा जातो . कारण जवळ गेल्यावर तो भ्रम आहे हे लक्ष्यात येते . म्हणूनच राहूच्या दशेत प्रत्येक व्यक्तीने समाजात वावरताना किंवा कुठल्याही गोष्टीत पैसा गुंतवताना , माणसे जोडताना अत्यंत सावध राहावे. एखादी व्यक्ती काही काळात खूप जवळ येते तीच धोक्याची घंटा असते. एखाद्या प्रोजेक्ट मध्ये असणारे खाचखळगे खूप नंतर समजून काहीही उपयोग नसतो . शेवटी पदरी निराशा पडते आणि आपण आपला आत्मविश्वास घालवून बसतो . कुणीतरी पैसे गुंतवले म्हणून आपणही लगेच त्याच्यासारखे करतो आणि मग ते पैसे जातात . 

पूर्वीचा काळी लोकांची जीवनशैली अत्यंत साधी होती पण आता आपण खूप सोशल झालो आहोत . त्यात इन्स्टा सारखा भूलभुलैया आपल्याला टार्गेट करायला तत्पर आहे. त्यातील वस्तूंच्या मोहात आपण पडतो आणि लगेच मागवतो . मग मागवलेली गोष्ट खराब निघाली कि डोके धरून बसतो .

राहुकडे डोके आणि मेंदू आहे त्यामुळे त्याच्याकडे विचार प्रणाली आहे . कट कारस्थाने करण्यात राहूचा हात कुणीही धरू शकणार नाही . गुप्त योजना , खलबते ह्यामध्ये राहू माहीर आहे. हि कुटील बुद्धी फक्त त्याचीच असू शकते . जगातील कुठलेही हेरखाते हे राहूच्या अस्तित्वाचे प्रतिक आहे . सट्टा , राजकारण ह्यावर पण राहूचा अंमल आहे. थोडक्यात काय जिथे जिथे षडयंत्र आहे तिथे राहू आहे.

राहूची जशी वाईट बाजू आहे तशी चांगली बाजू म्हणजे आजकालच्या प्रगत युगात “ इंटरनेट “ जो आपला श्वास आहे त्याचा कर्ताकरविता राहूच आहे. राहुने जग जवळ आणले आहे. ह्या युगावर राहुची सत्ता आहे म्हंटले तर वावगे ठरू नये. प्रगत यंत्रणा , फोटोग्राफी , अनिमेशन ग्राफिक्स ,इंटरनेट हे सर्व राहूच आहे. थोडक्यात टेक्नोलॉजी म्हणजे राहू . पूर्वीच्या काळी खोलीच्या आकाराच मशीन आज एका चीप वर आले आहे हि सगळी करामत राहुचीच आहे आणि हि सर्व यंत्रणा अत्यंत प्रगत आहे. 

आपल मोबाईल फोन , laptop म्हणजे राहू . एका क्षणासाठी आपला फोन आपल्याला दिसला नाही तर जणू श्वास थांबल्याच्या वरताण स्थिती होते आपली. हातात मोबाईल हे खेळणे हवेच. चालता बोलता , प्रवासात आपण सतत मोबाईल बघत असतो . सतत बघण्यासारखे असते तरी काय त्यात ? हेही एक व्यसनं आहे जे आपल्याला खात आहे , आपला मेंदू पोखरत आहे , आपली  बुद्धी उध्वस्त करत आहे. हि अत्यंत गंभीर बाबा आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम भयंकर आहेत . अनेक आजारांना  आपण स्वतःच्या कर्माने निमंत्रित करत आहोत . लहान मुलांकडे सुद्धा आता स्मार्ट फोन आहेत . मग मुले त्या फोनवर काय काय पाहतील हा वेगळा गहन विषय आहे ज्यावर तासंतास बोलता येयील.  आपण मुलांना सुरक्षिततेसाठी किंवा संपर्कात राहता यावे ह्या शुद्ध हेतूने फोन दिलेला असतो पण त्याचा उपयोग अनेक चुकीच्या गैर गोष्टींसाठी होतो तेव्हा काय करायचे होते आणि काय झाले असा विचार मनात येतो तोच राहू .

प्रचंड धाडस देणारा राहू आहे. खोटे बोलण्यात , हातचलाखी करण्यात राहू माहीर आहे . विषारी प्राणी , किटके ह्यांचाही कारक आहे , संसर्गजन्य आजार जे प्रचंड वेगाने पसरतात आणि आपली पचनसंस्था खराब करतात हे राहुच्याच अधिपत्याखाली येतात . प्रचंड मद्यपान करणे , सिगरेट चे व्यसन , सर्व प्रकारचे अमली पदार्थांचे सेवन म्हणजे राहूच . राहू प्रचंड प्रभावी आहे आणि म्हणूनच चंद्र ( मन ) आणि सूर्य ( आत्मा ) ह्यांना ग्रहण लावणारा राहूच आहे. आभासी जग म्हंटले तर व्यक्तीला जे काही दिसते त्याच्या पलीकडे असणारया अदृश्य जगताचे दर्शन घडवणारा राहूच आहे म्हणूनच अनेकदा राहुला अध्यात्माचा कारक सुद्धा म्हंटलेले आहे. आपल्या पत्रिकेत षष्ठ भावातील राहू आपल्या शत्रूंचा नाश करणारा ठरतो पण तोच तिथे अनाकलनीय निदान न होणारे आजार सुद्धा देऊन जातो. राहूच्या दशेत व्यक्तीच्या मनावर सतत कसलेतरी दडपण असते . अनाकलनीय भीतीच्या सावटाखाली जणू व्यक्ती वावरत असते , सगळाच संभ्रम असतो कश्याचीच शाश्वती वाटत नाही . कारण राहू तुमच्या अंतर्मनाचा ठाव घेतो आणि म्हणून तुमच्या मनात सतत कसली ना कसली भीती जागृत राहते . असे होईल का तसे होईल का ह्या सर्व भीती खरतर नसतात पण आपल्याला तसे वाटत राहते आणि हीच राहूची किमया आहे. There is a good saying …”  For the things which you fear the most happens only in your Imaginations …they never happen in the reality ..”  हे वाक्य सर्वांनी मनात कोरून ठेवावे म्हणजे भीती दडपण कमी होईल. 

राहुच्या चांगल्या वाईट दोन्ही बाजू आहेत , आपल्या पत्रिकेत राहू कुठल्या भावात राशीत आहे किती अंशावर आहे , कुठल्या नवमांशात आहे , त्यावरील इतर ग्रहांचे योग तपासले कि समजेल राहू नक्की कसा आहे.  पत्रिकेत असणारे कालसर्प राहूच्या प्रभावात असतात . आपल्या पूर्वजांचा कारक राहूच मानला आहे. अनेक मागील पिढ्यात कुणी व्यसनाधीन होणे, घरातून निघून जाणे , कुणी नाहीसे होणे त्याचे प्रेत सुद्धा न सापडणे , अविवाहित राहणे , वंशवेल खुंटणे , वेड लागणे , अकाली मृत्य , घरात एकमेकांबद्दल प्रेम नसणे , कुटुंब नष्ट होणे , अनेकदा वास्तू सुद्धा शापित असतात , अश्या वास्तुत आपण दोन मिनिटे सुद्धा बसू शकत नाही. घराच्या भिंतीना सतत जाणार्या भेगा , येणारा ओलसर पणा हे सर्व राहूच्या अमलाखाली आहे.  

कालभैरव अष्टक , दुर्गा देवीचे कवच , मंत्र जप , शंकराची उपासना , हनुमान चालीसा राहूचे परिणाम कमी करण्यास मदत करते . अपाय आहे तिथे उपाय आहे फक्त ते मनापासून करणे आवश्यक आहे. संध्याकाळी घरात जर रामरक्षा म्हंटली तर त्याचाही उपयोग नक्कीच होईल.

संपर्क : 8104639230

 

 

Web Title: Astrology: The mystery of many things related to birth and death is determined by the position of Rahu in the horoscope; Read in detail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.