माजलगाव तालुक्यात अतिवृष्टी; घळाटी नदीच्या पुरात एकजण वाहून गेला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 03:45 PM2019-10-25T15:45:15+5:302019-10-25T15:48:48+5:30

माजलगाव तालुक्यासह बीड जिल्ह्यातील 11 मंडळात अतिवृष्टीची नोंद  

Heavy rainfall in Majalgaon taluka; one man drawing in flood of Ghalati river | माजलगाव तालुक्यात अतिवृष्टी; घळाटी नदीच्या पुरात एकजण वाहून गेला 

माजलगाव तालुक्यात अतिवृष्टी; घळाटी नदीच्या पुरात एकजण वाहून गेला 

Next

बीड : गुरुवारी माजलगाव तालुक्यातील सर्व सहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तसेच बीड तालुक्यातील पिंपळनेर, गेवराई तालुक्यातील धोंडराई , गेवराई, परळीतील पिंपळगाव आणि वडवणी येथील कौडगाव मंडळातही अतिवृष्टीची नोंद झाली आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 576 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

घळाटी नदीच्या पुरात एक जण गेला वाहून
शुक्रवारी (दि. 25) सकाळी ७ वाजेच्या सुमारास बाबासाहेब श्रीरंग जगताप (४७ ) दिवाळीच्या खरेदीसाठी घळाटवाडी येथून माजलगावकडे जात होते. गुरुवारी अतिवृष्टी झाल्याने घळाटी नदीलापूर आला आहे. पुराच्या पाण्याचा अंदाज आल्याने नदी ओलांडताना जगताप वाहून गेले. याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शोधकार्य सुरु केले आहे.

Web Title: Heavy rainfall in Majalgaon taluka; one man drawing in flood of Ghalati river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.