टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 01:31 PM2024-05-08T13:31:07+5:302024-05-08T13:31:24+5:30

मदुराईवरून शिवकाशीला जात असताना कप्पलूर टोल प्लाझावर त्यांचा फास्टॅग स्कॅन झाला. परंतु परतत असताना स्कॅन होईना.

Toll plaza Employee took money, costing NHAI; Foreign driver complaint, fine of 25000 | टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड

टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड

टोल नाक्यांवरील झोल सर्वांनाच त्रासदायक आहे. अनेकदा अव्वाचे सव्वा पैसे आकारले जातात. तुमची गाडी घरीच असली तरी देशाच्या दुसऱ्या कुठल्यातरी कोपऱ्यात टोल कापला जातो. प्रत्यक्षात टोलनाक्यावरून जात असताना फास्टॅग स्कॅन होत नाही, मग दुप्पट पैसे घेतले जातात. हा सगळा फ्रॉडचाच एक प्रकार असतो. परंतू, याची तक्रार केली तर त्याची दखलही घेतली जात नाही, अशी आपल्याकडली व्यवस्था आहे. या व्यवस्थेला परदेशी नागरिक नडला आहे.

मदुराई जिल्हा ग्राहक तंटा निवारण आयोगाने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) ला जोरदार झटका दिला आहे. एका वाहन चालकाला रोखीने फास्टॅग फी घेतल्याच्या कारणावरून २५ हजारांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या व्यक्तीच्या वाहनाला फास्टॅग असूनही, तो कार्यरत असूनही स्कॅन होत नसल्याचे टोलनाक्यावर सांगितले गेले होते. तसेच त्याच्याकडून रोख पैसे घेतले गेले होते.

सर्वात दु:खद बाब म्हणजे  टोल कर्मचाऱ्याने त्यांच्याशी गैरवर्तन केले होते. तसेच त्यांना बराच वेळ थांबायला लावले होते. त्यांच्या फास्टॅगमध्ये पुरेशी रक्कम होती. तरीही त्यांना वाईट वागणूक देण्यात आली होती. अमेरिकन कॉलेजचे उप प्राचार्य असलेल्या मार्टिन डेविड यांच्यासोबत हा प्रकार घडला होता. त्यांचे वकील  दिनेश कुमार यांनी ही माहिती दिली.  

मदुराईवरून शिवकाशीला जात असताना कप्पलूर टोल प्लाझावर त्यांचा फास्टॅग स्कॅन झाला. परंतु परतत असताना ही घटना घडली होती. एनएचएआयने तर डेविड यांची फास्टॅग कंपनी एसबीआयला सेवा दिली नाही म्हणून खापर फोडण्याचा प्रयत्न केला होता. तसेच टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना उद्धट वागणूक दिली नसल्याचा दावा करत डेविड यांचे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. सुनावणीत हा दोष टोल नाक्यावरील स्कॅनरचा असल्याचे समोर आले आणि एनएचएआय तोंडघशी पडली. 

Web Title: Toll plaza Employee took money, costing NHAI; Foreign driver complaint, fine of 25000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.