Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 08:40 PM2024-05-16T20:40:11+5:302024-05-16T20:43:35+5:30

Mahindra XUV 3XO : मोठ्या मागणीनंतर, वेळेवर डिलिव्हरी सुनिश्चित करण्यासाठी महिंद्रा दरमहा XUV 3XO च्या 9000 युनिट्सचे उत्पादन करत आहे.

Mahindra XUV 3XO's record, 50000 bookings in just one hour! | Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!

Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!

नवी दिल्ली : महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra & Mahindra) नवीन एसयूव्ही महिंद्रा एक्सयूव्ही 3एक्सओची (SUV Mahindra XUV 3XO) बुकिंग सुरू करून फक्त एक दिवस उलटला आहे. यादरम्यान एसयूव्हीने शानदार रेकॉर्ड कायम केला आहे. या कारला तासाभरात 50 हजार बुकिंग मिळाले आहेत. अवघ्या 10 मिनिटांत 27 हजार लोकांनी बुकिंग केले आहे. या मोठ्या मागणीनंतर, वेळेवर डिलिव्हरी सुनिश्चित करण्यासाठी महिंद्रा दरमहा XUV 3XO च्या 9000 युनिट्सचे उत्पादन करत आहे.

महिंद्रा XUV 3XO एसयूव्ही एकूण 9 व्हेरिएंटमध्ये आणि 3 इंजिन ऑप्शनमध्ये येते. भारतीय बाजारपेठेत ही कार सब-4 मीटर एसयूव्ही सेगमेंटमधील Hyundai Venue, Tata Nexon, Kia Sonet आणि इतर कारशी स्पर्धा करते. या कारची सुरुवातीची किंमत 7.49 लाख रुपये आहे. तर टॉप व्हेरिएंटची किंमत 15.49 लाख रुपये आहे. या किंमती एक्स-शोरूमनुसार आहेत.

Mahindra XUV 3XO ची खासियत
महिंद्राची नवीन एसयूव्हीच्या काही गोष्टी इलेक्ट्रिक XUV400 शी मिळत्या जुळत्या आहेत. यात 10.25-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस ऍपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो, 7-स्पीकर हरमन कार्डन ऑडिओ सिस्टम, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, रिअर एसी व्हेंट्स, ॲड्रेनॉक्स कनेक्ट इन-कार कनेक्टिव्हिटी पॅक, मागील बाजूला टाइप-सी चार्जिंग पोर्ट, वायरलेस चार्जर यासारखी फीचर्स देण्यात आली आहेत. तसेच, कारला पॅनोरामिक सनरूफ देण्यात आले आहे, जे 940 मिमी लांब आणि 870 मिमी रुंद आहे. पॅनोरामिक सनरूफसह सेगमेंटमधील ही पहिली एसयूव्ही आहे.

Mahindra XUV 3XO चे सेफ्टी फीचर्स
या कारच्या सर्व व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग, मागील बाजूस डिस्क ब्रेक, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ISOFIX अँकर देण्यात आले आहेत. याशिवाय, हिल स्टार्ट, हिल डिसेंट असिस्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ऑटो होल्ड, ADAS लेव्हल 2 टेक्नॉलॉजी आणि 360 डिग्री कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये कारमध्ये टॉप-एंड व्हेरियंटमध्ये देण्यात आली आहेत.

Mahindra XUV 3XO चे इंजिन
ही SUV तीन इंजिन ऑप्शनसह येते. 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे 111bhp पॉवर जनरेट करते. हे 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. दुसरे म्हणजे 1.2 लीटर डायरेक्ट टर्बो पेट्रोल इंजिन, जे 131bhp पॉवर जनरेट करते. सोबत 6-स्पीड मॅन्युअल/ऑटोमॅटिक गिअरबॉक्स उपलब्ध आहे. तिसरे म्हणजे 1.5 लिटर डिझेल इंजिन. यात फक्त 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

Web Title: Mahindra XUV 3XO's record, 50000 bookings in just one hour!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.