lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 06-May-24

राशी भविष्य

 कन्या

कन्या

हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या पूर्वार्धात शारीरिक त्रास दिसत असला तरी उत्तरार्ध लाभ देणारा आहे. जुने मित्र भेटतील. विवाहितांच्या जीवनातील गोपनीय कार्य पूर्णत्वास नेण्यास मदत होईल. जुने वाद संपुष्टात येण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा अचानक लाभ करून देणारा आहे. एखाद्या सरकारी योजनेतून लाभ होईल. सरकारी नोकरीची तयारी करत असणाऱ्यांना यश प्राप्ती संभवते. प्रणयी जीवनात विशेष बदल होणार नाही. जुन्या मित्रांशी प्रेमळ व्यवहार होईल. राजकारणातील यशामुळे किंवा राजकारणी लोकांशी संबंध स्थापित झाल्याने आर्थिक लाभ सुद्धा होऊ शकतो. हा आठवडा सामाजिक प्रतिष्ठा उंचावणारा आहे. आपले व्यवहार चातुर्य व गोड बोलण्याचा स्वभाव आपणास एखादे सामाजिक पद मिळवून देऊ शकतो. माता - पिता चिंतीत होण्याची संभावना आहे. विवाहेच्छुक कन्यांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. प्रेमीजनां मधील प्रेम भावना वाढताना दिसेल. नवीन ओळखी भविष्य निर्माण करण्यास उपयुक्त होतील. आपल्या मित स्वभावामुळे आपली फसवणूक होत असल्याची भावना आपल्यात येते, जी आपणास चिंतीत करते. आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे आपणास नवीन संधी उपलब्ध होतील.

राशी भविष्य

05-05-2024 रविवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण द्वादशी

नक्षत्र : उत्तराभाद्रपदा

अमृत काळ : 15:46 to 17:23

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:29 to 17:17

राहूकाळ : 17:23 to 19:00