lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 02-May-24

राशी भविष्य

 धनु

धनु

आर्थिक दृष्ट्या हा आठवडा चांगला आहे. आपल्या खर्चात कपात होऊन प्राप्तीत वृद्धी होईल. व्यापाऱ्यांना थोडी आर्थिक गुंतवणूक सुद्धा करावी लागेल. मित्रांच्या मदतीने नवीन कंत्राट सुद्धा मिळतील. कामाच्या ठिकाणी कार्यभार वाढेल. आपला आत्मविश्वास उंचावलेला असेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. उच्च शिक्षणासाठी आठवडा ठीक आहे. आपली प्रकृती ठीक राहील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात चढ - उतार होत असल्याचे दिसून येईल. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेस आपल्या मनातील विचार सांगू शकतात. तिला एखादी भेटवस्तू सुद्धा देऊ शकतात. माता - पिता मुलांच्या भवितव्यासाठी आर्थिक गुंतवणूक करतील. आपणास जर एखादी जमीन खरेदी करावयाची असेल तर ती ह्या आठवड्यात आपण खरेदी करू शकता. आपण आपल्या व्यस्त कार्यक्रमातून स्वतःसाठी थोडा वेळ काढून आपल्या आवडीची कामे कराल.

राशी भविष्य

02-05-2024 गुरुवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण नवमी

नक्षत्र : धनिष्ठा

अमृत काळ : 09:20 to 10:56

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 10:7 to 10:55 & 14:55 to 15:43

राहूकाळ : 14:09 to 15:46