lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 29-Apr-24

राशी भविष्य

 मिथुन

मिथुन

प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेच्या सहवासात खुश असल्याचे दिसून येईल. तिच्यासह बाहेर फिरावयास जाण्याचा बेत सुद्धा आखतील. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात सुखद क्षणांचा उपभोग घेतील. जोडीदाराच्या प्रगतीने ते खुश झाल्याचे दिसून येईल. ह्या आठवड्यात खर्च वाढले तरी प्राप्ती सुद्धा वाढेल. आपण जर पूर्वी कोठे गुंतवणूक केली असेल तर त्याचा सुद्धा लाभ होईल. व्यापारात एखाद्या अनुभवी व्यक्तीचा पाठिंबा आपणास मिळेल. कामाच्या ठिकाणी कार्यभार वाढला तरी आपण आपली कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांचे मन विचलित झाल्याने अभ्यासाकडे त्यांचे लक्ष लागणार नाही. स्पर्धेसाठी आठवडा विशेष अनुकूल नाही. ऋतुमानातील बदलामुळे आपल्या प्रकृतीत चढ - उतार होतील. जे घरा पासून दूर राहून नोकरी करत आहेत ते घराच्या आठवणीने बेजार होतील. मित्रांच्या मदतीने आपणास प्राप्तीचे नवीन स्रोत मिळतील.

राशी भविष्य

29-04-2024 सोमवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण पंचमी

नक्षत्र : पूर्वाषाढा

अमृत काळ : 14:09 to 15:45

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 12:33 to 13:21 & 14:57 to 15:45

राहूकाळ : 07:45 to 09:21