lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 04-May-24

राशी भविष्य

 कर्क

कर्क

आर्थिक स्थिती चांगली असण्याची संभावना आहे. खर्चात कपात होईल. आपणास जर एखादी आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर ती खूपच विचारपूर्वक करावी. व्यापाऱ्यांना थोडी गुंतवणूक करावी लागू शकते. नोकरी करणाऱ्यांचे स्थान परिवर्तन संभवते. विद्यार्थी मन लावून अध्ययन करत असल्याचे दिसून येईल. स्पर्धेत यश प्राप्तीची संभावना आहे. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास आपले आवडते विषय शिकण्याची संधी मिळेल. आपली प्रकृती ठीक राहील. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. वडिलधाऱ्यां कडून आपल्यावर एखादी जवाबदारी सोपविण्यात येईल, जी आपण सहजपणे पूर्ण करू शकाल. भावाच्या विवाहात येणारे अडथळे पूजा - पाठ केल्याने दूर होतील. घरात मंगल कार्याचे आयोजन होईल. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. मातेचा सहवास व सहकार्य लाभेल.

राशी भविष्य

04-05-2024 शनिवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण एकादशी

नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा

अमृत काळ : 06:06 to 07:42

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 7:42 to 8:30

राहूकाळ : 09:19 to 10:56