lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 05-May-24

राशी भविष्य

 मेष

मेष

ह्या आठवड्याच्या सुरवातीस आपले खर्च वाढू शकतात. परंतु आठवड्याच्या उत्तरार्धात आपणास प्रवासाचे सौख्य मिळू शकते. आपण आपल्या जुन्या मित्रांना भेटू शकाल व आपल्या भवितव्या विषयी चिंतीत व्हाल. बाजारातून वस्तू खरेदी करण्याचे सुख आपणास उत्साह व आनंद प्रदान करेल. एखादा प्रवास किंवा तीर्थयात्रा आपल्या मित्रांसह किंवा नातेवाईकांसह होईल, ज्यात आपला लाभ होईल. व्यापारी त्यांच्या व्यापार वृद्धीसाठी अधिक आर्थिक गुंतवणूक करू शकतील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्यच आहे. कुटुंबियांसह सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपण बाहेरगावी जाऊ शकता. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे मनोबल कमकुवत असल्याचे जाणवेल. त्यांचे एकाग्रचित्त होऊ शकणार नाही. मुलांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यांना दुखापत होण्याची संभावना आहे. सावध राहून कामे करावीत. कुटुंबियांचा सहवास लाभदायी असला तरी काहीवेळा जुन्या गोष्टींना उजाळा मिळाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, तेव्हा सावध राहावे. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. मोठ्यांची आज्ञा पालन अवश्य करावी. नवीन कामाची सुरवात करण्यास आठवडा अनुकूल आहे.

राशी भविष्य

05-05-2024 रविवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण द्वादशी

नक्षत्र : उत्तराभाद्रपदा

अमृत काळ : 15:46 to 17:23

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 16:29 to 17:17

राहूकाळ : 17:23 to 19:00