lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 06-May-24

राशी भविष्य

 वृश्चिक

वृश्चिक

हा महिना आपल्या जीवनात चढ - उतार घेऊन येऊ शकतो. आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मानसिक ताण वाढेल, व त्यामुळे आपणास मानसिक नैराश्य सुद्धा येऊ शकते. ह्या महिन्यात खर्चात वाढ होईल, ज्याचा प्रभाव आपल्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. तेव्हा आपणास आर्थिक नियोजन करावे लागेल. नशिबाच्या भरंवशावर बसण्याची संवय सोडून मेहनत करण्यावर भर द्या. आळस आपला सर्वात मोठा शत्रू आहे. विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात तणाव असल्याचे जाणवेल. वैवाहिक जोडीदाराच्या क्रोधाचा सामना सुद्धा करावा लागू शकतो, परंतु एकमेकांवरील आपले प्रेम परिस्थितीस सांभाळून घेईल. प्रणयी जीवनासाठी हा महिना चांगला आहे. एखाद्या ठिकाणी रोमँटिक रात्री भोजनास किंवा रमणीय ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. त्यामुळे आपले प्रणयी जीवन अधिक सुखद होईल. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती होण्याची दाट संभावना आहे. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सुद्धा महिना अनुकूल आहे. व्यापाऱ्यांना त्यांच्या कार्यालयाचे नूतनीकरण करावे लागेल, त्यामुळे व्यापारात त्यांची चांगली प्रगती होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यासच अपेक्षित परिणाम मिळतील. महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी भविष्य

06-05-2024 सोमवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण त्रयोदशी

नक्षत्र : रेवती

अमृत काळ : 14:09 to 15:46

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 12:29 to 13:17 & 14:53 to 15:41

राहूकाळ : 07:42 to 09:19