lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 02-May-24

राशी भविष्य

 धनु

धनु

हा महिना आपल्या जीवनात चढ - उतार घेऊन येणारा आहे. आपली प्रकृती बिघडण्याची संभावना असल्याने आपणास त्याची काळजी घ्यावी लागेल. आपणास एखादा रक्ताशी संबंधित विकार किंवा पोटाचा विकार त्रस्त करण्याची शक्यता सुद्धा आहे. नोकरी करणाऱ्यांची स्थिती चांगली राहील. आपणास वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल व त्यांच्या सहकार्याने आपला पगार वाढण्याची संभावना सुद्धा आहे. व्यापाऱ्यांसाठी महिना सामान्यच आहे. आपण आपल्या योजना पूर्ण होण्याची वाट पाहावी. आपणास त्याचा फायदा होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. विद्यार्थ्यांसाठी महिना उत्तम आहे. त्यांनी आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित करावे, इतकेच. यश प्राप्ती होईल. विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात थोडा तणाव जाणवेल. परंतु तो दीर्घकाळ टिकणारा नसेल. आपसात बोलणी करून आपण त्यातून मार्ग सुद्धा काढू शकाल. आपण कुटुंब नियोजनावर लक्ष द्याल. प्रेमीजनांसाठी हा महिना अनुकूल आहे. आपण आपल्या प्रेमिकेच्या जेवढे जवळ जाण्याचा प्रयत्न कराल तितकेच तिला सुद्धा बरे वाटू लागेल. आपल्यातील समन्वय उत्तम राहील. ह्या महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी भविष्य

02-05-2024 गुरुवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण नवमी

नक्षत्र : धनिष्ठा

अमृत काळ : 09:20 to 10:56

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 10:7 to 10:55 & 14:55 to 15:43

राहूकाळ : 14:09 to 15:46