lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 02-May-24

राशी भविष्य

 मीन

मीन

हा महिना आपणास अनुकूल असण्याची संभावना आहे. महिन्याच्या सुरवातीस आपण एखादे मोठे काम हाती घेऊ शकता. असे केल्याने आपण त्यात यशस्वी व्हाल. आपल्या खर्चात कपात होऊन प्राप्तीत वाढ होईल. असे झाल्याने आपला आत्मविश्वास उंचावेल व त्यामुळे आपण काही नवीन कामे हाती घेण्यास प्राधान्य देऊन त्यात यशस्वी व्हाल. व्यापाऱ्यांना नवीन काम हाती घेण्यात यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांची कामाच्या ठिकाणी स्थिती सुधारेल. आपणास सहकाऱ्यांचे सहकार्य सुद्धा मिळेल. विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात काही त्रास जाणवेल, ज्या बद्धल ते त्यांच्या जोडीदाराशी बोलू सुद्धा शकतील. हळूहळू आपले वैवाहिक जीवन सुरळीत होऊन आपणास समाधान सुद्धा लाभेल. आपण आपल्या जोडीदारा बरोबरच त्यांच्या कुटुंबियांशी सुद्धा बोलू शकाल. प्रणयी जीवनासाठी हा महिना अनुकूल आहे. सध्या आपल्या जीवनात एखादी व्यक्ती येण्याची संभावना असून ती व्यक्ती आपल्या हृदयात स्थान सुद्धा मिळवू शकते. त्यामुळे आपला एकटेपणा दूर होईल. आपण जर आधी पासूनच कोणाच्या प्रेमात असाल तर आपल्यातील जवळीक वाढून प्रेमळ वार्तालाप सुद्धा होतील. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अत्यंत महत्वाचा आहे. ह्या महिन्यात त्यांच्या अनेक परीक्षा होण्याची शक्यता असून त्यात त्यांची कामगिरी चांगली होईल. आपण आपले पूर्ण योगदान देण्यास मात्र तयार राहावे. महिन्याचा चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी भविष्य

02-05-2024 गुरुवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण नवमी

नक्षत्र : धनिष्ठा

अमृत काळ : 09:20 to 10:56

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 10:7 to 10:55 & 14:55 to 15:43

राहूकाळ : 14:09 to 15:46