lokmat Supervote 2024

Lokmat Astrology

दिनांक : 02-May-24

राशी भविष्य

 तूळ

तूळ

हा महिना आपल्यासाठी चांगला आहे. आपली आर्थिक वाढ होईल. आपण जर नोकरी करत असाल तर आपणास पगारवाढ मिळू शकते. आपले विरोधक आपणास त्रास देतील, परंतु ते त्यात यशस्वी होणार नाहीत. आपणास चांगले परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्यांना नव्या नोकरीत जास्त फायदा होणार नसल्याने सध्याची नोकरी चालू ठेवणे हितकारक होईल. व्यापाऱ्यांना व्यापार वृद्धी बघावयास मिळेल. प्रगती चांगली होईल. काही नवीन लोकांचा पाठिंबा सुद्धा मिळेल. भागीदारीत लाभ होईल. आपले मित्र आपणास मदत करतील. कौटुंबिक जीवन सुखावह होईल. आपण एखाद्या परिषदेत सहभागी होण्यासाठी देशा बाहेर सुद्धा जाऊ शकता. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात रोमँटिक होतील. आपले वैवाहिक जीवन सुद्धा सुखद होईल. अचानकपणे बदल घडून जीवनात नावीन्य येईल. आपण जोडीदाराशी जवळीक साधाल व त्यामुळे आपल्यातील समन्वय सुद्धा उत्तम होईल. प्रणयी जीवनासाठी महिना काहीसा प्रतिकूल आहे. आपले नाते टिकवून ठेवण्यावर आपण लक्ष केंद्रित करावे. लहान - सहान समस्यांना बाजूस सारा. आपसात कोणत्याही गोष्टीस प्रतिष्ठेची बनवू नका. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल आहे. कमी श्रमात सुद्धा त्यांना चांगले परिणाम मिळतील. परंतु जितकी जास्त मेहनत कराल तितके चांगले परिणाम मिळवू शकाल. महिन्याचा पहिला व दुसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी भविष्य

02-05-2024 गुरुवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA कृष्ण नवमी

नक्षत्र : धनिष्ठा

अमृत काळ : 09:20 to 10:56

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 10:7 to 10:55 & 14:55 to 15:43

राहूकाळ : 14:09 to 15:46